घरमनोरंजनAryan Khan Released : शाहरुखचा बॉडीगार्ड रवी सिंह विरोधात मराठी अभिनेत्रीने गाठले...

Aryan Khan Released : शाहरुखचा बॉडीगार्ड रवी सिंह विरोधात मराठी अभिनेत्रीने गाठले होते पोलिस ठाणे

Subscribe

मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अखेर २७ दिवसांनी आर्थर रोड तुरुंगातून बाहेर आला आहे. १४ अटी-शर्थीवर न्यायालयाने आर्यन खानचा जामीन मंजूर केला आहे. मात्र मोठ्या प्रतिक्षेनंतर आर्यन खान मन्नतवर पोहचल्याने गौरी खानसह, चाहत्यांनी आनंदाचे वातावरण आहे. मन्नतवर देखील आर्यनच्या स्वागतासाठी मोठी तयारी करण्यात आली होती. पण आर्यनला आर्थर रोड तुरुंगापासून ते मन्नतपर्यंत सुखरुपरित्या आणण्याची जबाबदारी शाहरुख खानने सर्वात विश्वासू बॉडीगार्ड रवी सिंहवर सोपावली होती. अगदी आर्यनला तुरुंगाबाहेर आणत गाडीत बसवणं माध्यामांपासून आणि चाहत्यांच्या गराड्यातून वाचवत मन्नतपर्यंत पोहचवण्याचे काम रवी सिंहने केले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shah Rukh Khan (@shah.rukh.khan2)

- Advertisement -

मराठी अभिनेत्रीने गाठले होते पोलिस ठाणे

त्यामुळे आर्यन खानच्या सुटकेपासून रवी सिंह पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. अशातच बॉडीगार्ड रवी सिंहविरोधात एका अभिनेत्रीने दाखल केलेल्या गुन्हाची मोठी चर्चा होतेय. शाहरुखचा बॉडीगार्ड असलेल्या रवी सिंहविरोधात २०१४ मध्ये एका मराठी अभिनेत्रीने पोलिस ठाणे गाठत तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी वांद्रे-कुर्ला पोलिसांनी रवी सिंहला अटक केली होती. मात्र काही तासांनी त्याला सोडून देण्यात आली.

या तक्रार करणाऱ्या अभिनेत्रीचे नाव आहे शर्वरी. २०१४ साली एका पुरस्कार सोहळ्यावेळी शाहरुख खानसोबत असताना रवी सिंहने मराठी अभिनेत्री शर्वरी हिला धक्काबुक्की केली होती. शर्वरीकडे व्हीआयपी पास असूनही तिच्यासह रवी सिंह याने वाद घातला होता. यानंतर शर्वरी हीने वांद्रे-कुर्ला पोलीस ठाणे गाठत रवी सिंहविरोधात गुन्हा दाखल केला. मात्र रवी सिंह याने गर्दी नियंत्रण करत असताना शर्वरीला धक्काबुक्की झाल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी समज देऊन रवी सिंहला सोडून दिले. या प्रकरणामुळे रवी सिंह अधिक चर्चेचा विषय ठरला होता. रवी सिंह माध्यमांपासून दूर राहणे नेहमी पसंत करतो. मात्र आता आर्यन खानमुळे रवी सिंह पुन्हा चर्चेत आला आहे.

- Advertisement -

रवी सिंह गेली अनेक वर्षे शाहरुख खानचा सर्वात विश्वासू बॉडीगार्ड म्हणून काम करतो. यात आर्यन खानच्या जामीन अर्जावरील सुनावणी, एनसीबी चौकशी अशा अनेक ठिकाणी रवी सिंह त्याच्यासोबत दिसला होता. जवळपास १० वर्षांपासून रवी सिंह शाहरुख खानचा बॉडिगार्ड म्हणून काम पाहतोय.रवी सिंह शाहरूख खानसोबत अगदी सावलीप्रमाणे असतो. बॉलिवूडमधील सर्वात महागड्या बॉडीगार्डमध्येही रवी सिंहचे नाव घेतले जाते. रवी सिंगचा पगार हा वर्षाला तब्बल २.७ कोटी रुपये इतका आहे. शाहरुख खानच्या सुरक्षा व्यवस्थेचा रवी सिंह प्रमुख आहे. त्यामुळे शाहरुख सोबतचं गौरी खान, आर्यन खान आणि सुहाना खान यांच्या सुरक्षेची काळजी घेण्याचे कामही तो पाहतो.

रवी सिंगला कॅमेऱ्यासमोर येणं अनेकदा टाळतो. मात्र शाहरुखच्या अनेक फोटोंमध्ये तो त्याच्यासोबत पाहायला मिळतो. रवी सिंह शाहरुख खानसोबत पूर्ण दिवसभर असतो. दरम्यान आर्यन तुरुंगातून सुखरुप बाहेर आणण्यासाठीची जबाबदारी रवी सिंहवरच होती. आर्यन खान तुरुंगाबाहेर येताच मीडिया आणि चाहत्यांची प्रचंड गर्दी होणार ही गोष्ट शाहरुखला माहिती होती म्हणूनच आर्यनला कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये आणि तो माध्यमांच्या नजरेत येऊ नये याची जबाबदारी शाहरुखने रवी सिंहला दिली होती.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -