घरमनोरंजनशत्रुघ्न सिंन्हा यांच्या काळ्या रंगावरून सासूने लग्नासाठी केलं होतं रिजेक्ट

शत्रुघ्न सिंन्हा यांच्या काळ्या रंगावरून सासूने लग्नासाठी केलं होतं रिजेक्ट

Subscribe

शत्रुघ्न सिंन्हा यांना पहिल्या नजरेत अभिनेत्री पूनम चंदीरमानीवर प्रेम जडले होते.

बॉलिवूड अभिनेता शत्रुघ्न सिंन्हा (Shtughan Sinha)यांनी अनेक सुपरहिट सिनेमात काम केलं आहे. याचदरम्यान त्यांचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं. पण शत्रुघ्न सिंन्हा यांना पहिल्या नजरेत अभिनेत्री पूनम चंदीरमानीवर प्रेम जडले होते. पूनम यांना पहिल्यांदा पाहता क्षणीच शत्रुघ्न सिंन्हा यांचे ह्रदय धडधडू लागले होते. बॉलिवूड मधील या हिट जोडीला नुकतच इंडियन आयडलच्या मंचावर पाहण्यात आलं होतं. यादरम्य‌ान, दोघांनी त्यांच्या व्यक्तीगत आयुष्यातील अनेक गोष्टींचा उलगडा केला आहे.
शत्रुघ्न सिंन्ही यांनी विवाहदरम्यानचा एक किस्सा शेअर केला. अभिनेता शत्रुघ्न सिंन्हा म्हणाले,” मी पूनमच्या घरी लग्नाची मागणी घालण्यासाठी गेलो असता. मला पाहताच पूनमच्या आईने रिजेक्ट केलं. त्यांच्यामते पूनमसाठी मी योग्य वर नव्हतो. त्यांना आमच्या लग्नाला विरोध दर्शवला होता. तसेच त्या पुढे म्हणाल्या माझी मुलगी पूनम अत्यंत सुंदर आणि गोरी आहे आणि तू इताक काळा आहेस. तुम्हा दोघांना एकत्र उभे केल्यावर फोटो काढल्यावर रंगीत फोटो सुद्धा ब्लॅक अँन्ड व्हाईट दिसेन.”(shatrughan sinha was rejected by his mother in law)

- Advertisement -

शत्रुघ्न सिंन्हा यांच्याशी विवाह झाल्यानंतर पूनम यांनी अधिक काळ सिनेमात कामं केलं नाही. त्यांचा शेवटचा सिनेमा ‘जोधा अकबर’ ठरला या सिनेमात त्यांनी ऋतिक रोशनच्या आईची भूमिका साकारली होती. शत्रुघ्न सिंन्हा यांच्या वर्कफ्रंट बाबतीत सांगायचे झाल्यास सध्या ते राजकरणात सक्रिय आहेत.तसेच ते भारतीय राष्ट्रीय कांग्रेस पार्टीचे सदस्य आहेत.



हे हि वाचा – HBD: बॉलिवूडचा पॉवरहाउस अभिनेता रणवीर सिंग बद्दल या खास गोष्टी तुम्हाला माहितेय का ?

- Advertisement -


 

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -