घरमहाराष्ट्र'केले तुका झाले माका' म्हणत संजय राऊतांचा आमदारांच्या गैरवर्तनावर टोला

‘केले तुका झाले माका’ म्हणत संजय राऊतांचा आमदारांच्या गैरवर्तनावर टोला

Subscribe

१२ आमदारांचं निलंबन हा शिस्तीचा भाग - राऊतांची प्रतिक्रिया

पावसाळी अधिवेशनात पहिल्याच दिवशी विधानसभा अध्यक्षांच्या दालनात चांगलाच राडा झाला असल्याचे पाहायला मिळाले. यावेळी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये जोरदार धक्काबुक्की देखील करण्यात आले. दरम्यान, तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनाही धक्काबुक्की आणि शिवीगाळ देखील केल्याचा आरोप जाधव यांनी केला. यानंतर भाजपच्या १२ आमदारांच्या निलंबन करण्यात आलं. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप आमदारांच्या गैरवर्तनावर ‘केले तुका झाले माका’ म्हणत कोकणी म्हणीतून भाजपाला चांगलाच टोला लगावला आहे.

असे म्हणाले राऊत…

‘सभागृहात भाजपला बोलू दिलं जात नसल्यामूळे भाजप प्रतिसभागृह उभारण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती आहे. सरकारची कोंडी करण्याचा एक वेगळा प्रयत्न त्यांच्याकडून सुरू होता. परंतु तुका झाले माका या म्हणी प्रमाणे भाजपाची परिस्थिती झाली आहे. ते आमच्यावर बॉम्ब टाकत होते परंतु बाँब त्यांच्या हातातच फुटला.’ असे आमदारांच्या गैरवर्तनावर माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले. यासह एक चूक किती महागात पडू शकते. बेशिस्त वर्तन महाराष्ट्रात चालत नाही हे परत एकदा सिद्ध झाल्याचे देखील त्यांनी यावेळी म्हटले आहे.

- Advertisement -

१२ आमदारांचं निलंबन हा शिस्तीचा भाग

विधानसभा अध्यक्षांच्या दालनात शिवीगाळ करणे, धक्काबुक्की करणे अशा प्रकारची वर्तवणुक हे विधानसभेच्या इतिहासात प्रथमच झाले असल्याचे सांगत संजय राऊत म्हणाले, ‘१२ आमदारांचं वागणं अतिशय चुकीचं होतं. ते वेल मध्ये गेले हे आम्ही पाहिलं आहे. तालिका सभेचे अध्यक्ष भास्कर जाधव यांचे म्हणणे आहे की, त्यांना धक्काबुक्की झाली, शिवीगाळ झाली. सर्वोच्च न्यायालयाचं एक जजमेंट आहे, ज्यामध्ये कोर्टाने नमूद केलं आहे की, आमदारांचं किंवा खासदारांचं आशा प्रकारचं वर्तन सहन करता कामा नये. १२ आमदारांचं निलंबन हा शिस्तीचा भाग आहे. जर कारवाई केली नाही तर सभागृहात दंगली होतील जे आम्ही पाकिस्तानच्या सभागृहात पाहिलं आहे. बिहार, उत्तरप्रदेशच्या सभागृहात आम्ही हे पाहिलं आहे तिथं दंगली उसळ्यल्या आहेत. महाराष्ट्रात अशी परंपरा पडू नये, यासाठी आशा प्रकारचा कठोर निर्णय घेण्यात आला आहे.’


Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -