घरताज्या घडामोडीफरहानच्या मराठमोळ्या गर्लफ्रेंडने दिल्या बर्थडेच्या शुभेच्छा

फरहानच्या मराठमोळ्या गर्लफ्रेंडने दिल्या बर्थडेच्या शुभेच्छा

Subscribe

फरहान सोबतचा फोटो शेअर करून त्याला 'बेटर हाफ' असं शिबानीने म्हटलं आहे.

आज बॉलिवूड अभिनेता फरहान अख्यतरचा ४६ वा वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्ताने गर्लफ्रेंड शिबानी दांडेकरने त्याच्यासोबत क्युट फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. तिने फरहानला ‘बेटर हाफ’ म्हटलं असून नेहमी साथ दिल्याबद्दल आभार मानले आहेत. शिबानी आणि फरहान खूप दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. नेहमी त्याच्या व्हेकेशनचे फोटो दोघं सोशल मीडियावर शेअर करत असतात.

फरहाना अख्तरच्या पहिल्या पत्नीचे नाव अधुना होते. फरहान आणि अधुना यांचे २००० मध्ये लग्न झाले होते. पहिल्या पत्नीपासून फरहानला दोन मुली आहेत. लग्न होऊनही फरहानचे दुसऱ्या मुलीसोबत अफेअर असल्यामुळे त्याचा घटस्फोट झाला होता. या घटस्फोटानंतर फरहान शिबानीच्या प्रेमात पडला. शिबानीने आपल्या रोमँटिक पद्धतीने फरहानला ४६ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

- Advertisement -

शिबानीने असं लिहिलं की, ‘वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, मला भेटलेल्या व्यक्तीपैकी तू खूपच मस्त आहेस. या जगाला तुझ्यासारखे लोक हवे आहेत. माझ्या आयुष्यात आनंद, प्रेम आणल्याबद्दल धन्यवाद. तुझ्यासारखा काळजी करणारा, शूर  असलेला व्यक्ती अजून मला भेटलेला नाही. तुझ्या आयुष्यात मला सामावून घेतल्याबद्दल धन्यवाद.’

View this post on Instagram

Happy birthday my better half .. thank you for all the magic, laughter and love you have brought to my life .. you are one of the most beautiful souls I have ever met and the world really needs more like you! I’ve never met anyone as kind, as attentive, as selfless, as brave and as focused as you.. Just being around you has taught me so much ( mainly patience!!) You inspire me! thank you for including me in every part of your life, for making me feel so special and for always making time for ‘us’ !! Having said that you do need to ‘unclench’ a little.. be more ‘free flowing’ ?? To many more sessions in the ring, savouring protein bars together,late night walks with Jim Jam, Jlo movies, finishing my word crossy and foot rubs!! Love you my Foo always ❤️ Can’t wait for the next round ?? @faroutakhtar photo by @errikosandreouphoto style by @pashamalwani HMU @mallikajolly @azima_toppo shibani’s outfit – @dior Farhan’s shirt @hemantandnandita Trousers @bodicebodice

A post shared by Shibani Dandekar (@shibanidandekar) on

- Advertisement -

तसंच तिने पुढे असं लिहिलं, ‘अजून जिम जाम सोबत लेट नाईट वॉक, जिओ मुव्ही आणि प्रोटीन बारमध्ये एकत्र जाणे या गोष्टी करणं बाकी आहे. पुढच्या वेळीची वाट नाही पाहू शकतं, लव यू फू.’

सध्या फरहान अख्तर आगामी ‘तुफान’ या चित्रपटाच्या तयारीत व्यग्र आहे. या चित्रपटात फरहान बॉक्सरची भूमिका करत आहे. फरहान अख्तरसोबत परेश रावल देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. २ ऑक्टोबरला ‘तुफान’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


हेही वाचा – दोन वेळा झाला होता ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीचा गर्भपात


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -