घरमनोरंजनShraddha Kapoor : 'हे' आहेत श्रद्धा कपूरचे गाजलेले चित्रपट

Shraddha Kapoor : ‘हे’ आहेत श्रद्धा कपूरचे गाजलेले चित्रपट

Subscribe

अभिनेत्री श्रद्धा कपूरने बॉलिवूडमध्ये पदार्पण करत एक उत्तम अभिनेत्री म्हणून ओळख निर्माण केली आहे. अनेक वेगवेगळ्या भूमिका साकारत तिने रसिकांच्या मनावर राज्य केलंय. आज आम्ही तुम्हाला श्रद्धाच्या हिट चित्रपटांबाबत माहिती देणार आहोत. श्रद्धा कपूरने 2010 मध्ये ‘तीन पत्ती’ सिनेमातून फिल्मी करिअरला सुरुवात केली. दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांनी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. पण, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर गाजला नाही.

आशिकी 2 (Ashiqui 2)

एका चित्रपटाने श्रद्धा कपूरला रातोरात स्टार बनवलं. 2013 साली प्रदर्शित झालेला ‘आशिकी 2’ हा एक म्युझिकल रोमँटिक चित्रपट होता. या चित्रपटात श्रद्धासोबत आदित्य रॉय कपूर मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटात श्रद्धा आणि आदित्यची केमिस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच आवडली होती. 1990 मध्ये प्रदर्शित झालेला महेश भट्ट यांचा चित्रपट ‘आशिकी’ प्रदर्शित झाल्यानंतर 23 वर्षानंतर या चित्रपटाने कोट्यावधी रुपयांचा गल्ला जमवला.

- Advertisement -

एक विलन (Ek Villian)

‘आशिकी 2’ चित्रपटानंतर श्रद्धाने पुन्हा एकदा मोहित सूरी दिग्दर्शित ‘एक विलन’ या रोमॅंटिक हॉरर चित्रपटात प्रमुख भूमिकेत काम केले. या सिनेमाने ही बॉक्स ऑफिसवर 100 कोटींपेक्षा अधिक कमाई केली होती. अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि श्रद्धा कपूर यांची जोडी पहिल्यांदाच या सिनेमात एकत्र आली होती. या दोघांच्या सोबत अभिनेता रितेश देशमुखने ही या सिनेमात प्रमुख भूमिकेत काम केले होते. सिद्धार्थ आणि श्रद्धाची सिझलिंग केमिस्ट्री चाहत्यांच्या पसंतीस पडली होती. या सिनेमातील गाणी देखील चांगलीच हीट झाली होती.

एनी बडी कॅन डान्स 2 (ABCD 2)

बॉलिवूड कोरिओग्राफर रेमो डिसूझा दिग्दर्शित या ABCD 2 या चित्रपटात श्रद्धाने तिच्या नृत्यशैलीने सर्वांनाच थक्क केले होते. या चित्रपटात तिने एका उत्कृष्ट डान्सरची भूमिका साकारली आहे, जी तिची स्वप्ने साकार करण्यास उत्सुक आहे. या चित्रपटातील वरुण धवनसोबत श्रद्धाची सिझलिंग केमिस्ट्रीही प्रेक्षकांना आवडली होती. श्रद्धाचा हा चित्रपट सुपरहीट झाला होता. त्यानंतर याच सिनेमाचा तिसरा भाग स्ट्रीट डान्सर 3 डी 2020 मध्ये रिलीज झाला होता. त्याला ही चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता.

- Advertisement -

स्त्री (Stree)

2018 मध्ये रिलीज झालेला श्रद्धाचा हा सुपरहीट चित्रपट चांगलाच गाजला होता. अमर कौशिक दिग्दर्शित ‘स्त्री’ हा चित्रपट ब्लॉकबस्टर हिट ठरला. या चित्रपटातील श्रद्धा कपूर आणि अभिनेता राजकुमार राव यांची ही जोडी हीट ठरली होती. दोघांच्या ही अभिनयाचे लोकांनी खूप कौतुक केले होते.

छिछोरे (Chichorre)

नितेश तिवारी दिग्दर्शित ‘छिछोरे’ या सिनेमात अभिनेत्री श्रद्धा कपूरने दमदार भूमिका साकारली होती. दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतसोबत श्रद्धाने या सिनेमात रोमान्स केला होता. या सिनेमात एका चुलबुली कॉलेजच्या तरुणीपासून ते घटस्फोटित महिलेचा प्रवास श्रद्धाने चांगल्या प्रकारे वठवला होता.

हैदर

दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांचा ‘हैदर’ हा सिनेमा 2014 मध्ये रिलीज झाला होता. या सिनेमात अभिनेता शाहिद कपूर, अभिनेत्री श्रद्धा कपूर, तब्बू, के.के.मेनन, दिवगंत अभिनेते इरफान खान यांच्या प्रमुख भूमिका होत्या.

‘तू झूठी मैं मक्कार’

2023 साली रिलीज झालेला ‘तू झूठी मैं मक्कार’ या चित्रपटात श्रद्धा कपूर आणि रणबीर कपूर यांनी महत्त्वाची भूमिका साकरली होती. श्रद्धा कशी स्वत: नातं मोडण्यासाठी बॉयफ्रेंडकडेच मदत मागते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -