घरमनोरंजनधार्मिक भेदभावामुळे दाक्षिणात्य अभिनेत्रीला मंदिरात प्रवेश नाकारला

धार्मिक भेदभावामुळे दाक्षिणात्य अभिनेत्रीला मंदिरात प्रवेश नाकारला

Subscribe

केरळमधील एका हिंदू मंदिरामध्ये दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमाला पॉलला प्रवेश नकारल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. अमाला केरळमधील एर्नाकुलमच्या महादेव मंदिरामध्ये गेली होती. परंतु मंदिर प्रशासनाने तिला दर्शन करुन दिले नाही. अमालाने आरोप केले आहेत की, धार्मिक भेदभावामुळे तिला केरळमधील एर्नाकुलम तिरुवैरानिकुलम महादेव मंदिरात प्रवेश नाकारण्यात आला. अमाला पॉल धर्माने ख्रिश्चन आहे. त्यामुळे तिला नकार दिल्याच म्हटलं जातंय.

अमाला पॉल सोमवारी तिरुवैरानिकुलम महादेवाच्या मंदिरात गेली होती. त्यावेळी तिला प्रवेश नकारला मंदिराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, या मंदिरात केवळ हिंदूंनाच प्रवेश दिला जातो. त्यानंतर अमालाने मंदिराबाहेरुनच देवाचे दर्शन घेतले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Amala Paul (@amalapaul)

- Advertisement -


मंदिरामध्ये प्रवेश न मिळाल्याने अमालाने तिचा अनुभव मंदिराच्या विजिटर्स रजिस्टरमध्ये लिहिला आहे. “देवाला न पाहता देखील तो माझ्या जवळ आहे, असं मला वाटतं. 2023 मध्ये धार्मिक भेदभाव अजूनही अस्तित्वात आहे. हे पाहून मला दुःख वाटतंय. मी देवाजवळ जाऊ शकले नाही पण लांबूनही तो जवळ असल्याचं जाणवलं. मला आशा आहे की, या धार्मिक भेदभावात लवकरच बदल होईल. वेळ येईल आणि आपल्या सर्वांना समान वागणूक दिली जाईल.” असं अमालाने लिहिलं आहे.

मंदिर प्रशासनावर टीका
मंदिराचे प्रशासन आता महादेव मंदिर ट्रस्टच्या अंतर्गत आहे. मंदिर प्रशासनाशी जोडलेल्या अधिकारांच्या मते, त्यांनी केवळ मंदिराच्या नियमांचे पालन केले आहे. मंदिर ट्रस्टचे सचिव प्रसून कुमार म्हणाले की, या मंदिरामध्ये इतर धर्माचे लोक येतात की नाही हे कोणालाच ठाऊक नसतं. परंतु जेव्हा कोणता मोठा कलाकार येतो तेव्हा खूप वाद होतो.

- Advertisement -

 


हेही वाचा :

प्रेक्षकांच्या मागणीवरून ‘द काश्मीर फाइल्स’ पुन्हा चित्रपटगृहात होणार प्रदर्शित

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -