घरमनोरंजन'तुला पाहते रे'च्या टीमला सुबोधने दिलं खास गिफ्ट

‘तुला पाहते रे’च्या टीमला सुबोधने दिलं खास गिफ्ट

Subscribe

जुलै महिन्यात 'तुला पाहते रे' ही मालिका प्रेक्षकांचा घेणार निरोप

झी मराठी वाहिनीवरील ‘तुला पाहते रे’ या मालिकेच नुकतंच शेवटच्या भागाचे शूट पार पडलं. या मालिकेनं अल्पवधीकाळातच प्रक्षेकांची मन जिंकून घेतली होती. पण प्रेक्षकांची मन जिंकून घेतलेली ही मालिका जुलै महिन्यात प्रक्षेकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेची फेअरवेल पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीमध्ये सुबोध भावेने सगळ्या टीमला खास गिफ्ट दिलं.

सुबोध भावेने दिलेल्या गिफ्टचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे आणि त्याने पोस्टला खूप छान कॅप्शन दिलं आहे. ‘माझ्याकडून “तुला पाहते रे” संघाला एक छोटीशी आणि प्रेमळ भेट’

- Advertisement -

या फेअरवेल पार्टीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

- Advertisement -

‘तुला पाहते रे’ ही मालिका नेहमीच टीआरपीच्या स्पर्धेत पुढे होती. या मालिकेमधील सुबोधने साकारलेली विक्रांत सरंजामेची व्यक्तिरेखा तर गायत्रीने साकारलेली ईशा निमकरची व्यक्तिरेखा ही प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहील. सुबोध भावेची झी मराठी वरील ‘तुला पाहते रे’ ही दुसरी मालिका होती. यापूर्वी सुबोध हा ‘कुलवधू’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. गायत्रीने या मालिकेच्या माध्यमातून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. या मालिकेतील वय विसरायला लावणाऱ्या प्रेमकहाणीने तरुणपिढीला वेडं लावलं.

सध्या या मालिकेत झेंडेने ईशाचे अपहरण करण्याचा कट रचला होता. पण त्यावेळी विक्रांत सरंजामे हा आनंदाची बातमी सांगण्यासाठी ईशाकडे जातो. त्याच वेळी झेंडेने पाठवलेले गुंड ईशाचे अपहरण करतात. मात्र विक्रांत ईशाला वाचवतो. या दरम्यान ईशाला गुंड गोळी मारत असताना विक्रांत ईशाला वाचवण्यासाठी गेल्याने त्याच्या हाताला गोळी लागते. त्यामुळे सध्या मालिकेत विक्रांत सरजांमेवर उपचार सुरु असल्याचे दाखवलं आहे. मालिकेचा शेवट आता नेमका काय होणार हे येत्या एपिसोडमध्ये कळेलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -