घरदेश-विदेशखुशखबर..! बँकेच्या परीक्षा आता देता येणार मराठीमधून

खुशखबर..! बँकेच्या परीक्षा आता देता येणार मराठीमधून

Subscribe

केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांची माहिती

तुम्ही जर बँक अधिकारी होण्यासाठी तयारी करत असाल तर या बातमीमुळे तुम्हाला नक्की आनंद होईल कारण या परीक्षा आता मराठीमध्ये होणार आहे. या परीक्षा आता इंग्रजीसह इतर १२ प्रादेशिक भाषांमध्ये परीक्षा होणार असल्याची माहिती आज केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. प्रादेशिक भाषांमध्ये आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, कोकणी, मल्याळम, मणिपुरी, मराठी, पंजाबी, तेलगू, तमिळ आणि उर्दू या भाषांचा समावेश असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

यापूर्वी या परीक्षा फक्त इंग्रजी मधून घेतल्या जात होत्या त्यामुळे प्रादेशिक भाषेमध्ये तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे कुचंबणा होत होती. पण आता या निर्णयामुळे प्रादेशिक भाषेतून तयारी करणाऱ्या अधिकाऱ्यांचे प्रमाण वाढणार आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -