घरमहाराष्ट्रपत्ता विचारण्याच्या बहाण्याने कॅब चालकाला लुटले

पत्ता विचारण्याच्या बहाण्याने कॅब चालकाला लुटले

Subscribe

पत्ता विचारण्याच्या बहाण्याने कॅब चालकाला धारदार शस्त्राचा धाक दाखवून १६ हजार रुपयांची लुट केल्याची घटना समोर आली आहे.

पत्ता विचारण्याच्या बहाण्याने मोटारीतील कॅब चालकाला धारदार शस्त्राचा धाक दाखवून लुटल्याची घटना मध्यरात्री पिंपरी-चिंचवड शहरात घडली आहे. याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस अधिक तपास करत आहेत. पिंपरी चिंचवड येथील मोशी येथे राहणारे दशरथ भानुदास चारले (२४) यांना लुटल्याची तक्रार त्यांनी दाखल केल आहे.

नेमके काय घडले?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दशरथ हे कॅब चालक असून ते मध्यरात्री मोशी बोऱ्हाडेवाडी येथे लघुशंका करण्यासाठी थांबले आणि लगेच मोटारीत बसले. तेव्हा दुचाकीवरून आलेल्या चार अज्ञात व्यक्तींनी पत्ता विचारण्याचा बहाणा करून त्यांच्या जवळ येताच धारदार शस्त्राचाधाक दाखवत त्यांच्या जवळील रोख रक्कम १६ हजार रुपये तसेच मोटारीतील पॉकेट घेऊन पसार झाले. त्यावेळी दशरथ यांनी त्यांच्या दुचाकीचा नंबर घेण्याचा प्रयत्न केला असता त्यातील एकाने पाहिले असता त्यांच्या कॅबची काच फोडली. यात कॅब चालक दशरथचे मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक बांबळे हे अधिक तपास करीत आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – कल्याणमध्ये चोरट्यांनी भरदिवसा पेट्रोल पंपाची लाखोची कॅश लुटली

हेही वाचा – सोन्याच्या व्यापार्‍यावर हल्ला दागिने लुटले


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -