घरमनोरंजनयशराज फिल्म्सच्या अडचणीत वाढ; पोलिसांनी मागितली सुशांतसोबतच्या कराराची प्रत

यशराज फिल्म्सच्या अडचणीत वाढ; पोलिसांनी मागितली सुशांतसोबतच्या कराराची प्रत

Subscribe

बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर सिनेसृष्टीतील लॉबिंगचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. सुशांत हा बॉलीवूडमधील घराणेशाहीचा बळी ठरला असल्याचे बोलले जात आहे. त्याच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनीही चौकशीचा वेग वाढवला असून सिनेक्षेत्रातील विविध लोकांची चौकशी पोलीस करत आहेत. दरम्यान, बॉलीवूडमधील सर्वात मोठी फिल्म कंपनी असलेल्या यशराज फिल्म्स प्रोडक्शन हाऊसकडेही त्यांनी सुशांत सिंह राजपूतसोबत केलेल्या चित्रपटांच्या कराराची प्रत मागितली आहे. त्यामुळे सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी आता मोठमोठ्या बॅनरच्या कंपन्यांनाही पोलीस तपासाला सामोरे जावे लागणार आहे.

हेही वाचा – आंदोलकांचा अतिउत्साह; जिन पिंगऐवजी जाळला किम जोंगचा पुतळा !

- Advertisement -

सुशांतने छिछोरे नंतर सात चित्रपट साईन केले होते. मात्र गेल्या सहा महिन्यात त्याच्या हातून सर्व चित्रपट निघून गेले. बॉलीवूडमधील बड्या प्रोडक्शन हाऊसने त्याला बॉयकॉट केल्याचे वृत्त काही दिवसांपासून समोर येत आहे. त्यातच यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली दोन चित्रपटांमध्ये सुशांतचे काम केले असून त्याच्यासोबतच्या कराराची प्रत पोलिसांनी मागितली आहे. सुशांत सिंह राजपूतची गर्लफ्रेंड अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिचीदेखील आज पोलिसांनी चौकशी केली. वांद्रे पोलीस ठाण्यात तब्बल १० तास रियांची चौकशी सुरू होती. गेल्या काही महिन्यांपासून सुशांत मानसिक आजाराने त्रस्त होता. तो नैराश्यात असल्याचे त्याच्या मित्रपरिवाराकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, सुशांतला आत्महत्या करण्यासाठी भाग पाडले असल्याचे काही सेलिब्रिटींकडून बोलले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -