घरमनोरंजनTabbu : 'क्रू' मधील तब्बूच्या व्यक्तिरेखेसाठी होतंय खूप कौतुक

Tabbu : ‘क्रू’ मधील तब्बूच्या व्यक्तिरेखेसाठी होतंय खूप कौतुक

Subscribe

स्वत:ला सतत नवनवीन आव्हाने देणारी अभिनेत्री तब्बू ही तिच्या अष्टपैलु व्यक्तिमत्व आणि सदाबहार लूकसाठी नेहमीच इंडस्ट्रीत महत्त्वाची राहिली आहे. तब्बू, करिना कपूर व क्रिती सेनॉन अभिनीत ‘क्रू’ चित्रपट शुक्रवारी (29 मार्च) चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. दणक्यात सुरुवात झालेल्या या चित्रपटानं पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली.

क्रू या चित्रपटातील गीता या भूमिकेतून तब्बूने पुन्हा एकदा जगभरातील प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. तिने मजेशीर भूमिका साकारत चर्चेत आली आहे. अभिनेत्रीने नेटिझन्स आणि समीक्षकांकडून प्रशंसा मिळवली आहे. तब्बूला क्रूमध्ये तिची भूमिका वेगळा अनुभव देते. तिचे कौशल्य देखील या भूमिकेत दिसत आहे. तिचे योगदान केवळ चित्रपटातच भर घालत नाही तर इंडस्ट्रीतील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक म्हणून तिच्या स्थिती सिद्ध करते. करीना कपूर खानने देखील या सिनेमात चांगले काम केले आहे. संपूर्ण चित्रपटात तिचे एक्सप्रेशन अप्रतिम दिसत होते. दुसरीकडे इतक्या दिवसांनी तब्बूला ग्लॅमरस आणि वेगळ्या अवतारात पाहून चाहत्यांना आनंद झाला. तब्बूला याआधी लोकांनी पोलिसाच्या भूमिकेत पाहिले होते. या चित्रपटातील तिची आणि करिनाची जोडीही खूपच रंजक आहे. क्रिती सननने देखील या चित्रपटात चांगली भूमिका केली आहे.

- Advertisement -

‘क्रू’नं पहिल्या दिवशी जगभरात 20.07 कोटींची कमाई करून, आलियाच्या 2022 रोजी प्रदर्शित झालेल्या ब्लॉकबस्टर चित्रपट ‘गंगूबाई काठियावाडी’च्या ओपनिंगला मागे टाकलं आहे. तर, भारतात ‘क्रू’नं पहिल्या दिवशी 8.75 कोटी रुपये कमावले आहेत. इन्स्टाग्राम स्टोरीजवर ‘क्रू’च्या टीमला शुभेच्छा देणारी फक्त आलिया भट्टच नाही, तर भूमी पेडणेकर व हुमा कुरेशी यांनीही या चित्रपटाला शुभेच्छा दिल्या आणि कौतुक केले.

दरम्यान, ‘क्रू’ चित्रपटाबद्दल सांगायचं झालं, तर राजेश ए कृष्णन दिग्दर्शित ‘क्रू’ चित्रपटात करीना कपूर, तब्बू व क्रिती सेनॉन एअर होस्टेसची भूमिका साकारली आहे. बालाजी टेलिफिल्म्स आणि अनिल कपूर फिल्म अॅण्ड कम्युनिकेशन नेटवर्क बॅनरखाली बनलेला हा चित्रपट 29 मार्चला प्रदर्शित झाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -