घरमनोरंजनGuilty Minds : पहिली कायद्यावर आधारित मालिका ‘गिल्टी माइंड्स’ची घोषणा; प्राईमवर पाहता...

Guilty Minds : पहिली कायद्यावर आधारित मालिका ‘गिल्टी माइंड्स’ची घोषणा; प्राईमवर पाहता येणार

Subscribe

‘गिल्टी माइंड्स’ ही मालिका अमेझॉन ओरिजिनल (Amazon Original) सिरीजवर प्रेक्षक पाहून त्याचा आनंद घेऊ शकणार आहेत. कायद्यावर आधारित ही दहा भागांची मालिका असणार असून 22 एप्रिल 2022 ला भारत व इतर 240 देशांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

पहिली कायद्यावर आधारित मालिका ‘गिल्टी माइंड्स’ घोषणा प्राईम व्हिडीओद्वारे करण्यात आलीय. या ‘गिल्टी माइंड्स’(Guilty Minds) मालिकेमध्ये अभिनेत्री श्रेया पिळगावकर (Shreya Pingavkar) आणि अभिनेता वरुण मित्रा (Varun Mitra) हे प्रमुख भूमिका निभावताना दिसणार आहेत. ‘गिल्टी माइंड्स’ मालिका कायद्याच्या सुव्यवस्थेवर आधारित असून, दोन महत्त्वाकांक्षी वकिलांचा प्रवास दाखवण्यात आला आहे. या मालिकेत एक अतिशय प्रामाणिक आणि सरळ मार्गाने चालणारा वकील आणि दुसरा वकील हा एका प्रतिष्ठित कायदे कंपनीमध्ये काम करणारा असला तरी काळे धंदे करताना दाखवलाय. या दोन्ही तात्त्विकदृष्ट्या भिन्न भूमिका पाहायला मिळणार आहेत.

 

- Advertisement -

सहदिग्दर्शन केलेल्या कायदा सुव्यवस्थेमध्ये एक सरळ मार्गी आणि एक काळे धंदे करणाऱ्या वकिलांचा प्रवास दाखवण्यात आला आहे. या न्यायालयीन नाट्याचे निर्माते करण ग्रोव्हर (Karan Grover) यांनी ह्या दोन्ही तात्त्विकदृष्ट्या भिन्न वकिलांची कथा दाखवली आहे. आणि याचे सहनिर्माते अंतरा बॅनर्जी (Antara Banerjee) आणि नावेद फारूकी (Naved Farooqi) आहेत. भारतामध्ये आणि 240 अन्य देशा-प्रदेशात राहणाऱ्यांसाठी ही मालिका प्राईम व्हिडीओवर पाहता येणार असून, 22 एप्रिल 2022 पासून अमेझॉन ओरिजिनल (Amazon Original) सिरीजवर प्रेक्षक ती पाहून त्याचा आनंद घेऊ शकणार आहेत. कायद्यावर आधारित ही दहा भागांची मालिका असून, 22 एप्रिल 2022 ला भारत व इतर 240 देशांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

- Advertisement -

 

 

View this post on Instagram

 

A post shared by amazon prime video IN (@primevideoin)

‘गिल्टी माइंड्स’ मालिकेत या दोन महत्त्वाकांक्षी वकिलांची कथा दाखवली आहे. या ‘गिल्टी माइंड्स’ मालिकेचे निर्माते आणि दिग्दर्शिका शेफाली भूषण (Shefali Bhushan) आणि जयंत दिगंबर सामळकर (Jayant Digambar Samalkar) यांनी केले आहे. ‘गिल्टी माइंड्स’ या मालिकेत नम्रता शेठ, सुगंधा गर्ग, कुलभूषण खरबंदा, सतीश कौशिक, बेन्जामिन गिलानी, वीरेंद्र शर्मा, दीक्षा जुनेया, प्रणय पचौरी, दीपक कालरा आणि चित्रागंदा सात्रुपा हे सर्व महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत. त्याचप्रमाणे करिष्मा तन्ना आणि शक्ती कपूर, कृष्णमूर्ती हे पाहुणे कलाकार असणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -