घरमनोरंजन'द काश्मिर फाईल्स'ला भारतीय चित्रपटांतील गोल्डन फिल्म म्हणून मिळाला पुरस्कार

‘द काश्मिर फाईल्स’ला भारतीय चित्रपटांतील गोल्डन फिल्म म्हणून मिळाला पुरस्कार

Subscribe

बॉलिवूड चित्रपट दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द काश्मिर फाईल्स’ चित्रपटाने आणखी एक पारितोषिक पटकावले आहे. नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या भारतीय टेलिव्हिजन पुरस्कार 2022 मध्ये या चित्रपटाने पारितोषिक पटकावले. दरम्यान, यंदा हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. प्रदर्शनानंतर या चित्रपटावर अनेक टीका करण्यात आल्या मात्र तरीही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर उत्तम कमाई केली.

चित्रपटाला मिळाला आणखी एक सन्मान
चित्रपट निर्माते विवेक अग्निहोत्री यांच्या यावर्षी प्रदर्शित झालेल्या ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाबाबत बराच वाद झाला आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना आवडला तर काही लोकांनी यावर टीका केली. या चित्रपटामुळे विवेक अग्निहोत्रींना दिग्दर्शक म्हणूनही भरभरून दाद मिळाली. शिवाय आता या चित्रपटाला इंडियन टेलिव्हिजन अवॉर्ड्स (ITA) मध्ये भारतीय चित्रपटातील गोल्डन फिल्म म्हणून सन्मानित करण्यात आले आहे.

- Advertisement -

विवेक अग्निहोत्रींना शेअर केला फोटो

चित्रपट दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी त्यांच्या सोशल मीडियावर अकाऊंटवर ट्रॉफीसोबतचा एक फोटो शेअर करून प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. अवॉर्ड शोमधील फोटो शेअर करत विवेक अग्निहोत्री यांनी लिहिलंय की, “#TheKashmirFiles ला गोल्डन अवॉर्ड दिल्याबद्दल @TheITA_Official धन्यवाद..हा एक लोकांचा चित्रपट आहे. मी फक्त एक माध्यम आहे…आम्ही हा पुरस्कार सर्व काश्मिरी हिंदू पीडितांना समर्पित करतो.”

- Advertisement -

या ट्वीट व्यतिरिक्त विवेक अग्निहोत्री यांनी आणखी काही ट्वीट शेअर केले आहेत. ज्यात त्यांनी अवॉर्ड मिळाला त्यादरम्यानचे फोटो शेअर केले आहेत. तसेच खाली त्यांनी खाली कॅप्शनमध्ये लिहिलंय की, “भारतीय चित्रपटांतील गोल्डन फिल्म म्हणून #TheKashmirFiles ला हा पुरस्कार देण्यात आला आहे. हा पुरस्कार धार्मिक दहशतवादाच्या सर्व बळींना समर्पित आहे.”

 


हेही वाचा :

‘दृश्यम 2’ने अक्षय कुमारच्या तीन ब्लॉकब्लस्टर चित्रपटांना देखील टाकलं मागे

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -