घरताज्या घडामोडीनिवडणुका होईपर्यंत चीन शांत होते की..., तवांग संघर्षाबाबत संजय राऊतांचा सवाल

निवडणुका होईपर्यंत चीन शांत होते की…, तवांग संघर्षाबाबत संजय राऊतांचा सवाल

Subscribe

गुजरातमधील तसंच देशातील विधानसभा निवडणुका होईपर्यंत चीन शांत होते की त्यांना शांत राहण्यास सांगण्यात आले होते, असा सवाल उपस्थित करत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर संताप व्यक्त केला. अरुणाचल प्रदेशातील तवांगच्या यांगत्से सीमाभागात चिनी सैनिकांशी झालेल्या चकमकीत अनेक भारतीय जवान जखमी झाले.

गुजरातमधील तसंच देशातील विधानसभा निवडणुका होईपर्यंत चीन शांत होते की त्यांना शांत राहण्यास सांगण्यात आले होते, असा सवाल उपस्थित करत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर संताप व्यक्त केला. अरुणाचल प्रदेशातील तवांगच्या यांगत्से सीमाभागात चिनी सैनिकांशी झालेल्या चकमकीत अनेक भारतीय जवान जखमी झाले. भारत-चीनच्या या वादावरून देशभरातील राजकारण तापले आहे. ९ डिसेंबरला दोन्ही देशांचे सैनिक आमने-सामने आले होते. (Thackeray Group Mp Sanjay Raut On Indian Chinese Soldiers Conflict In Arunachal Pradesh)

दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी आठ दिवसांनी ही माहिती समोर आली असून, देशाचे संरक्षणमंत्री काय लपवत आहेत? असा सवाल उपस्थित केला आहे. ”गुजरातमधील तसंच देशातील विधानसभा निवडणुका होईपर्यंत चीन शांत होते की त्यांना शांत राहण्यास सांगण्यात आले होते. लडाख, डोकलामनंतर आता तवांगमध्ये घुसले आहेत. लडाखमधून चिनी सैन्य बाहेर काढल्याची चर्चा झाली आणि आता तवांगमध्ये घुसले आहेत. देशाच्या राज्यकर्त्यांनी राजकारण, तपास यंत्रणा, विधानसभा, विरोधी पक्ष यावर लक्ष देण्यापेक्षा असुरक्षित झालेल्या सीमांवर लक्ष द्यावे. चीनसारखा शत्रू तिन्ही बाजूंनी घुसत आहे, तिथे लक्ष दिले तर खऱ्या अर्थाने राष्ट्राची सेवा होईल. विरोधी पक्ष संसदेच्या दोन्ही सभागृहात राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करु. परिस्थिती गंभीर आहे. सरकार राजकारणात गुंतून असल्याने चीन, पाकिस्तान आणि इतर सगळे शत्रू धडका मारत आहे आणि सरकार गांभीर्याने घेत नाही” अशी टीका संजय राऊतांनी केली आहे.

- Advertisement -

”पंतप्रधान, संरक्षणमंत्र्यांनी देशापासून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न सातत्याने केल्याचं तवागमधील घटनेवरुन स्पष्ट दिसत आहे. तवांगमध्ये शुक्रवारी चकमक झाली आणि आठ दिवसांनी हे प्रकरण समोर आलं आहे. जखमी सैनिक गुवाहाटीमधील रुग्णालयात उपचार घेत आहे. सत्य काय आहे हे कळायला मार्ग नाही. आपले किती सैनिक जखमी झाले आहेत, काही जवान शहीद झाले आहेत का? यासंबंधी सरकार अधिकृत माहिती देत नाही. गलवानसंबंधी झालं तेच तवांगसंबंधी दिसत आहे. गुजरात निवडणुका जिंकल्याचा उत्साह सुरु असताना चीनचं सैनिक तवांगमध्ये घुसखोरी करत होतं. याचा अर्थ तुम्ही या देशाच्या सुरक्षेचंहा राजकारण आणि उत्सव केला आहे. राजकारण कोणत्या थराला गेलं आहे हे पहायचं असेल तर तवांगमधील घटना देशाच्या दृष्टीने दुर्दैवाची आहे”, असे संजय राऊत यांनी सांगितले.


हेही वाचा – …तर हळूहळू महाराष्ट्रही बंद होईल; संजय राऊतांचा इशारा

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -