घरमनोरंजनस्मरणात राहणारा महिला दिन

स्मरणात राहणारा महिला दिन

Subscribe

8 मार्च म्हणजे महिलांसाठी हक्काचा आनंदाचा दिवस. महिला दिनाचे निमित्त घेऊन जगभर हा दिवस साजरा केला जातो. महिला संघटित होत असतात. दीन-दुबळ्या स्त्रीला या निमित्ताने आधार दिला जातो, जिने कर्तृत्त्व सुद्धा केलेले आहे तिला पुरस्काराने सन्मानीत केले जाते. ज्या स्त्रीने आयुष्यभर महिलांच्या प्रगतीचा ध्यास घेतला त्या दिवंगत महिलांचे यानिमित्ताने स्मरण केले जाते. एकंदरीत काय तर आनंदी आनंद असे वातावरण महिलांच्या वाट्याला येते. श्रृती चंदना, एरिका फर्नांडीस यांनी या दिनाचे निमित्त घेऊन भरपूर धमाल, मस्ती केलेली आहे, तीही स्वित्झर्लंडच्या बर्फाच्छादीत प्रदेशात.

छोटा पडदा पहाणार्‍या प्रेक्षकांसाठी या दोन नायिका तशा नवीन नाहीत. भारतीय टेलिव्हिजनवर वेगवेगळ्या भूमिका निभावून आपल्यातील अभिनेत्री त्यांनी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. सुरभीने ‘इश्कबाज’ मध्ये मुख्य भूमिका निभावली होती, तर एरिका ही ‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेत दिसली होती. अनेक वर्षे मालिकेसाठी काम केल्यानंतर परदेशी जाण्याचा योग आपल्या वाट्याला येईल, असे या दोघींनाही वाटले नव्हते. कायम स्मरणात राहील असा हा महिला दिन त्यांच्यासाठी असणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -