बॉलिवूडमधील ‘या’ कलाकारांनी केलंय डेस्टिनेशन वेडिंग

बॉलिवूड अभिनेत्री हंसिका मोटवानीचं 4 डिसेंबर रोजी व्यवसायिक सोहेल कथुरियासोबत डेस्टिनेशन वेडिंग करणार आहे. त्यांच्या लग्नाची तयारी आता सुरु झाली असून नुकत्याच एक-दोन दिवसांपूर्वी तिला आपल्या कुटुंबासोबत मुंबई एअरपोर्टवर जयपुरसाठी रवाना होताना पाहण्यात आलं. दरम्यान, आता हंसिकाचा मेहंदी फंक्शन सुरु झाला आहे. ज्याचे फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. या फोटो आणि व्हिडीओमध्ये हंसिका लग्नासाठी खूप उत्साही असल्याचं दिसून येत आहे. हंसिका आणि सोहेल कथुरिया यांचं लग्न 4 डिसेंबर रोजी जयपूरच्या मुंडोटा फोर्टमध्ये डेस्टिनेशन वेडिंग करणार आहे. दरम्यान, हंसिका आधी अनेक बॉलिवूड कलाकारांनी देखील डेस्टिनेशन वेडिंग केलं आहे.

कतरिना कैफ-विकी कौशल


कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्याकडे बॉलिवूडमधील प्रसिद्ध जोडी म्हणून पाहिले जाते. यांचे लग्न राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्सेस रिसॉर्टमध्ये झाले होते.

प्रियंका चोप्रा-निक जोनस


बॉलिवूडसह हॉलिवूडमध्ये देखील आपल्या अभिनयाची छाप उमटवणारी प्रियंका आणि तिचा पती निक जोनसने त्यांचे लग्न ताज उम्मेद भवन पॅलेसमध्ये केले होते.

विराट कोहली-अनुष्का शर्मा


बॉलिवूडमधील डेस्टिनेशन वेडिंगच्या यादीत अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांचा समावेश आहे. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचे लग्न 11 डिसेंबर 2017 रोजी इटलीतील एका सुंदर व्हिलामध्ये झाले होते.

दीपिका पादुकोण-रणवीर सिंह


दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांच्या 4 वर्षे पूर्ण झाली आहेत. रणवीर-दीपिकाचे लग्न 14 नोव्हेंबर 2018 रोजी इटलीतील लेक कोमो येथे झाले होते.

 


हेही वाचा :

…तर हातात शस्त्रच असावं लागतं, शरद पोंक्षेंचं धारदार वक्तव्य