‘या’ आठवड्यात बॉलिवूडपासून टॉलिवूडपर्यंत ‘हे’ चित्रपट होणार प्रदर्शित

जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात सुद्धा अचेक काही धमाकेदार चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या आठवड्यात बॉलिवूडसोबतच काही तेलगू, तमिळ चित्रपट सुद्धा प्रदर्शित होणार आहेत

चित्रपटसृष्टी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी नेहमीच सज्ज असते. प्रत्येक आठवड्याच्या शुक्रवारी चित्रपटगृहात अनेक चित्रपट प्रदर्शित होतात. यावेळी अनेक चित्रपटप्रेमी चित्रपट प्रदर्शित होण्याची आतुरतेने वाट पाहत असतात. आता जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात सुद्धा अचेक काही धमाकेदार चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या आठवड्यात बॉलिवूडसोबतच काही तेलगू, तमिळ चित्रपट सुद्धा प्रदर्शित होणार आहेत.

२२ जुलै रोजी हे चित्रपट होणार रिलीज

शमशेरा
मागील अनेक दिवसांपासून रणवीर कपूरचा शमशेरा चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटात रणवीर कपूरसोबत वाणी कपूर सुद्धा मुख्य भूमिकेत दिसून येणार आहे. या चित्रपटात रणवीर दोन वेगवेगळ्या भूमिका साकारताना दिसणार आहे. सोबतच संजय दत्त खलनायकाची भूमिका साकारतना दिसणार आहे. येत्या २२ जुलै रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

आरके


बॉलिवूडमध्ये शमशेरा व्यतिरीक्त आरके चित्रपट सुद्धा रिलीज होणार आहे. या चित्रपटा रजत कपूर मुख्य भुमिकेत दिसणार असून त्यासोबत मल्लिका शेरावत, रणवीर शौरी आणि कुब्रा सैत हे सुद्धा मुख्य भूमिका साकारताना दिसून येतील. आरके चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेत्री मल्लिका शेरावत पुन्हा चित्रपटात कमबॅक करत आहे.येत्या २२ जुलै रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

थँक्यू


साउथ अभिनेता नागा चैतन्यचा थँक्यू चित्रपट २२ जुलै रोजी चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन विक्रम कुमार यांनी केलं आहे. थँक्यू चित्रपटात नागा चैतन्य व्यतिरिक्त अविका गौर आणि मालविका नायर सुद्धा मुख्य भूमिकामध्ये दिसून येतील.२२ जुलै रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

पाव्स ऑफ द फ्यूरी: द लेजेंड ऑफ हँक


‘पाव्स ऑफ द फ्यूरी: द लेजेंड ऑफ हँक’ या एक अॅनिमेटेड मार्शल आर्ट चित्रपट आहे. १५ जुलै रोजी यूएसमध्ये प्रदर्शित झाला होता. आता या भारतात २२ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.


हेही वाचा :आयुष्याच्या या मजेशीर प्रवासामध्ये तू माझ्यासोबत…पोस्ट शेअर करत निक जोनसने दिलं प्रियांकाला खास सरप्राइज