घरट्रेंडिंगलोकसभेतही शिवसेनेत फुट; राहुल शेवाळेंना गटनेता करण्यासाठी 'शिंदे' खासदारांचे लोकसभा अध्यक्षांना पत्र

लोकसभेतही शिवसेनेत फुट; राहुल शेवाळेंना गटनेता करण्यासाठी ‘शिंदे’ खासदारांचे लोकसभा अध्यक्षांना पत्र

Subscribe

आमदार, नगरसेवकांनंतर आता खासदारांनीही शिंदे गटात सहभाग घेतला आहे. शिंदे गटातील १२ खासदारांनी लोकसभेत वेगळा गट तयार केला असून, शिवसेनेच्या बंडखोर खासदारांनी लोकसभा अध्यक्षांची भेट घेतली.

आमदार, नगरसेवकांनंतर आता खासदारांनीही शिंदे गटात सहभाग घेतला आहे. शिंदे गटातील १२ खासदारांनी लोकसभेत वेगळा गट तयार केला असून, शिवसेनेच्या बंडखोर खासदारांनी लोकसभा अध्यक्षांची भेट घेतली. तसेच, या खासदारांनी लोकसभेत वेगळा गट स्थापन करण्याचा आणि त्या गटाचे नेते म्हणून राहुल शेवाळे (rahul shewale) यांची नियुक्ती करण्याचे पत्र दिले आहे. याबाबत नाशिकचे शिवसेनेचे बंडखोर खासदार हेमंत गोडसे (Shiv sena mp hemant godse) यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत माहिती दिली. (12 shiv sena mps meet lok sabha speaker to form separate group for group leader of rahul shewale)

या मुलाखतीत हेमंत गोडसे यांनी आम्ही लोकसभेत वेगळा गट स्थापन करत असल्याचे म्हटले. तसेच, “शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आम्ही सोबत घेऊन चाललो आहोत. याच विचारांशी जुळून आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जात आहोत. आमचा काही गट नाही. खासदारांनी निर्णय घेतला आहे. आमचे गटनेते विनायक राऊत होते. आता राहुल शेवाळे आमचे गटनेते करावे असे पत्र लोकसभा अध्यक्षांना दिले आहे. त्यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यानंतर आमची भूमिका स्पष्ट होणार आहे. आम्ही सर्व १२ खासदारांनी गटनेतेपद शेवाळे यांना द्यावं हीच मागणी केली आहे. आपली नैसर्गित युती ज्यांच्याबरोबर आहे. त्यांच्यासोबत २५ वर्ष राहिलो. आताही त्यांच्यासोबत राहावे अशी आमची इच्छा होती. अडीच वर्षापूर्वी अनैसर्गिक सरकार आले. त्यावेळी अनेक वेगळे अनुभव आले. त्यामुळे खासदारांमध्ये अस्वस्थता होती. ही आघाडी घातक ठरेल असे वाटत होते. त्यामुळे शिंदेंनी पहिले पाऊल टाकले आणि त्यानंतर त्यांना प्रतिसाद मिळू लागला”, असे खासदार हेमंत गोडसे यांनी म्हटले.

- Advertisement -

शिवसेनेचे १२ खासदार फुटणार असल्याची कालपासून चर्चा होती. त्यानंतर आज अखेर शिवसेनेत (shiv sena) फुट पडली आहे. शिवसेनेच्या १२ खासदारांनी लोकसभेत वेगळा गट तयार केला आहे. त्यासाठी शिवसेनेच्या बंडखोर खासदारांनी आज लोकसभा अध्यक्षांची भेट घेतली. परिणामी आता खासदारांनीही वेगळा गट तयार केल्याने शिवसेनेची चांगलीच कोंडी झाली आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) दिल्लीत गेले आहेत. शिंदे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. यावेळी हे १२ खासदारही त्यांच्यासोबत असणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – शरद पवारांनी डाव साधला आणि शिवसेना फोडली, रामदास कदमांचा खळबळजनक आरोप

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -