घरमनोरंजनविक्रांत-इशाचे शुभमंगल सावधान

विक्रांत-इशाचे शुभमंगल सावधान

Subscribe

‘तुला पाहते रे’ या मालिकेतील विक्रांने इशाला प्रपोज तर केले आहे. मात्र आता हे दोघे विवाह बंधनात केव्हा अडकणार हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे.

झी मराठीवरील नुकतीच सुरू झालेली मालिका म्हणजे, ‘तुला पाहते रे’. या मालिकेच्या आगळ्यावेगळ्या विषयामुळे आणि तगड्या स्टार कास्टमुळे अवघ्या काही दिवसातच या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या मालिकेतून वय विसरायला लावणारे आगळेवेगळे प्रेम पाहायला मिळत आहे. या जोडीतून अभिनेता सुबोध भावे आणि नवोदित अभिनेत्री गायत्री दातार ही वेगळी आणि फ्रेश जोडी प्रेक्षकांसमोर आली आहे. या अनोख्या जोडीलाही प्रेक्षकांनी लगेच स्विकारलं आहे. मालिकेच्या सुरूवातीपासूनच प्रेक्षकांनी या मालिकेवर केलेल्या प्रेमामुळे ही मालिका नंबर वन देखील ठरली आहे. विक्रांत इशाला प्रपोज केव्हा करणार ही उत्सुकता आता संपली असली तरी मात्र हे दोघे विवाहबंधनात केव्हा अडकणार ही उत्सुकता प्रेक्षकांमध्ये वाढलेली पाहायला मिळत आहे.

- Advertisement -

या तारखेला विक्रांत-इशा अडणार विवाहबंधनात

‘टाइम्स ऑफ इंडियाने’ दिलेल्या वृत्तानुसार विक्रांत-इशा नवीन वर्षात विवाहबंधनात अडकणार आहे. विक्रांत-इशाचे १३ जानेवारी रोजी एक तासाचा विशेष एपिसोड प्रसारित होणार आहे. या विशेष भागात इशा आणि विक्रांतचे शुभमंगल सावधान होणार आहे. या दोघांमधील वयाचं आणि राहणीमानाचं अंतर पाहता हे लग्न कोणत्याही विघ्नांविना पार पडणार का हे या एपिसोडमध्ये पाहणं औत्सुक्याचं ठरेल.


वाचा – सुबोध भावेच्या अभिनेत्रीची ‘ही’ स्टोरी तुम्हाला माहितीये का?

- Advertisement -

वाचा – ‘तुला पाहते रे’ची सरशी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -