घरमनोरंजन'तुला पाहते रे’ची सरशी

‘तुला पाहते रे’ची सरशी

Subscribe

यंदाच्या झी अवॉर्डस सोहळ्यात 'तुला पाहते रे’ या मालिकेने ९ पुरस्कार पटकावून बाजी मारली आहे.

दिवाळी सण जवळ आला की, प्रेक्षकांनामध्ये देखील उत्सुकता वाढते ती म्हणजे यंदाचा झी मराठीवरील सर्वोत्कृष्ट व्यक्तीरेखेचा पुरस्कार कोणाला मिळणार? लोकप्रिय नायक, विजयी नायिका कोण होणार? लोकप्रिय मालिकेचा मान कुणाला मिळणार? असे सर्वच प्रश्न प्रेक्षकांना पडत आहेत. मात्र यंदाच्या झी अवॉर्डस सोहळ्यात बाजी मारली आहे ती झी मराठी वाहिनीवरील ‘तुला पाहते रे’ या मालिकेने. त्या पाठोपाठ ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेने देखील चांगली बाजी मारल्याचे दिसून येत आहे. ‘तुला पाहते रे’ या मालिकेने ९ पुरस्कार पटकावले असून ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेने ५ पुरस्कार पटकावले आहेत. त्यासोबतच लागिरं झालं जी आणि बाजी या मालिकांमध्ये चुरशीची स्पर्धा रंगली आहे.

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेला विशेष पुरस्कार

यंदा झी मराठीने १९ वर्षे पूर्ण केली आहेत. यानिमित्त एक रंगतदार सोहळा आयोजित करण्यात आला असून हा सोहळा येत्या २८ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या झी मराठी अवॉर्डसमध्ये नुकतीच सुरु झालेली ‘तुला पाहते रे’ या मालिकेने चांगलीच बाजी मारली आहे. या मालिकेने ९ पुरस्कार मिळवले आहेत. तर ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेने देखील एक विशेष पुरस्कार पटकावला असून त्यांना देखील गौरवण्यात आले आहे. प्रेक्षकांच्या मतांद्वारे निवडण्यात येणाऱ्या पुरस्कारांसाठी भरघोस मतदानही झाले आहे. अभिजीत खांडेकर आणि संजय मोने यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -