घरमनोरंजनअभिनेत्री प्रियांकाने केली आत्महत्या

अभिनेत्री प्रियांकाने केली आत्महत्या

Subscribe

प्रियांकाने अनेक मालिकांमधून काम केली आहेत. गेली काही दिवस तिची मानसिक स्थिती चांगली नव्हती. त्यातूनच तिने हे पाऊल उचलले असावे

तामिळ मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांकाने तिच्या राहत्या घरी आत्महत्या केली आहे. चेन्नईमधील राहत्या घरात तिने गळफास लावत ही आत्महत्या केल्याचे समोर आले असून. घरगुती वादातून ही आत्महत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. सध्या ती तामिळ भाषेतील प्रसिद्ध मालिका वशंममध्ये तिने काम केले होते. त्यातील तिची ज्योती ही व्यक्तिरेखा खूप प्रसिद्ध होती. तिच्या जाण्याने तिच्या फॅन्सवर शोककळा पसरली आहे.

tamil tv actress_priyanka
अभिनेत्री प्रियांका

मोलकरणीने पाहिला मृतदेह

नेहमी प्रमाणे तिची मोलकरीण तिच्या घरी सकाळी कामासाठी आली. तेव्हा तिला प्रियांकाचा मृतदेह फॅनला लटकलेला दिसला. तिने तातडीने पोलिसांना बोलावले. त्यानंतर तिचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला.

- Advertisement -
priyanka_with ramya krishna
राम्या क्रिष्णासोबत प्रियांका

घरगुती वादातून जीवन संपवले

प्रियांकाचे तीन वर्षांपूर्वी अरुणबालाशी लग्न झाले होते. पण या दोघांमध्ये मतभेद होते. गेल्या २ महिन्यांपासून ती वेगळी राहत होती. शिवाय तिला मूल नसल्यामुळे तिची भांडणं होत असल्याचे देखील पोलिसांनी सांगितले आहे. या मानसिक तणावाखाली तिने आत्महत्या केली असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

अनेक मालिकांमधून केली कामे

तामिळ भाषेतील टीव्ही मालिकांमधून प्रियांकाने काम केली असून वंशम मालिकेमुळे तिला अधिक प्रसिद्ध मिळाली. सन टीव्हीवर लागणारी ही मालिका बाहुबली सिनेमातील शिवगामी अर्थात राम्या क्रिष्णाची होती.२०१३ ते २०१७ या कालावधीत ही मालिका चालली. या शिवाय अपूर्वा रंगानंगल, बैरावी या मालिकेतून तिने काम केली आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -