Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन ...ये नया हिंदुस्तान है! ये घर में घुसके मारेगा....!

…ये नया हिंदुस्तान है! ये घर में घुसके मारेगा….!

Subscribe

२०१६ च्या सर्जिकल स्ट्राइकवर आधारीत 'उरी...दि सर्जिकल स्ट्राइक' या चित्रपटाचे टीझल रिलीज झाले आहे.

भारतीय लष्कराच्या शौर्याची गाथा सांगणाऱ्या उरी…दि सर्जिकल स्ट्राइक या चित्रपटाचा टीझल लाँच झाला आहे. रॉनी स्क्रूवाला या निर्मितीत बनणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य धार यांनी केले आहे. तर सध्याचा लोकप्रीय अभिनेता विकी कौशल या चित्रपटात मध्यवर्ती भूमिका साकारत आहे. भारतीय लष्कराने २०१६ साली केलेल्या सर्जिकल स्ट्राइकवर आधारीत हा चित्रपट बनवण्यात आला आहे. त्याचा टीझर आज रिलीज झाला असून हा चित्रपट पुढील वर्षात ११ जानेवारी २०१९ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सत्य घटनेवर आधारीत कथानक 

- Advertisement -

सत्य घटनेवर आधारीत हा चित्रपट असणार आहे. टीझरला अभिनेता परेश रावल यांनी आवाज दिला असून भारतीय लष्करावर शत्रू देशातून झालेल्या आक्रमणांबाबत या चित्रपटात भाष्य करण्यात आलं आहे. मुख्यत्वे २८ आणि २९ सप्टेंबर २०१६ रोजी भारतीय जवानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राइकवर हे कथानक बेतलेलं आहे. यातील संवादही आक्रमक आणि हृदयाला भिडणारे आहेत. ‘हिंदुस्तान अब चुप नही बेठेका… ये नया हिंदुस्तान है. हिंदुस्तान घर में घुसेगा भी और मारेगा भी’, असे तडफदार संवाद याच्या टीझरमध्ये ऐकायला मिळत आहे. चित्रपटातील अभिनेता विकी कौशलने यांचा टीझर त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर शेअर केला आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -