घरमनोरंजनज्येष्ठ रंगभूषाकार प्रभाकर भावे यांचे वयाच्या 78 वर्षी निधन

ज्येष्ठ रंगभूषाकार प्रभाकर भावे यांचे वयाच्या 78 वर्षी निधन

Subscribe

ज्येष्ठ रंगभूषाकार प्रभाकर भावे यांचे आज पहाटे वयाच्या 78 वर्षी निधन झाले आहे. पुण्यातील मुलीच्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ब्रेनस्टयूमर आजाराने ग्रस्त होते. हळूहळू त्यांचे अवयव निकामी होऊ लागले होते. मागील अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती अस्थिर होती. त्यांच्या जाण्याने त्यांचे कुटुंबीय शोक समुद्रात बुडाले आहेत.आज दुपारी 11:30 च्या सुमारास त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या पश्चात दोन मुली, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.

55 वर्षांची यशस्वी कारकीर्द

- Advertisement -

विंगेत गलबला - प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट प्रभाकर भावे | मिसळपावज्येष्ठ रंगभूषाकार प्रभाकर भावे यांची रंगभूषाकार म्हणून त्यांची सुमारे 55 वर्षांची कारकीर्द होती. महाराष्ट्रातील सर्व नावाजलेल्या नाट्य स्पर्धांशी ते रंगभूषाकार म्हणून संबंधित होते. मुखवटे तयार करण्यात त्यांचा हातखंडा होता. त्यांच्या या कारकीर्दीच्या प्रवासात त्यांनी ‘रंगभूषा’ नावाचे पुस्तक देखील त्यांनी लिहिले होते शिवाय पु.ल. देशपांडे यांच्या हस्ते त्या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं होतं. या पुस्तकाला राज्य सरकारचा त्या वर्षीचा उत्तम साहित्यकृतीचा पुरस्कार देखील मिळाला होता.


हेही वाचा :

ज्येष्ठ वृत्तनिवेदक डॉ. विश्वास मेहेंदळे यांचे वयाच्या 84 व्या वर्षी निधन

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -