घरमहाराष्ट्र'व्हॅलेंटाईन डे'चा दिवस समजून जा, सगळं काही प्रेमाने होईल; सत्तासंघर्षावर राऊतांची मिश्कील टिप्पणी 

‘व्हॅलेंटाईन डे’चा दिवस समजून जा, सगळं काही प्रेमाने होईल; सत्तासंघर्षावर राऊतांची मिश्कील टिप्पणी 

Subscribe

महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावरील पुढील सुनावणी पुन्हा एकदा लांबवणीवर पडली आहे. यावर पुढील सुनावणी आता 14 फेब्रुवारी रोजी होणार आहे. शिवसेनेतील 16 आमदारांच्या अपातेच्या मुद्द्यावरून आणि शिवसेनेतील फुटीनंतर निर्माण झालेल्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी पार पडली. मात्र ही सुनावणी आता 14 फेब्रुवारी रोजी सात न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर सलग घेण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एक मिश्किल टिप्पणी केली आहे. आमचं घटनेवर प्रेम आहे, व्हेलंटाईन डेचा दिवस आहे, समजून जा, सगळं काही प्रेमाने होईल, अशी मिश्किल प्रतिक्रिया राऊतांनी दिली आहे.

यावर राऊत म्हणाले की, आमचं घटनेवर प्रेम आहे, 14 फेब्रुवारीपासून घटनापीठ सलग सुनावणी घेणार आहे, ही आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आज मुख्य न्यायाधीशांनी सांगितलं की, 14 फेब्रुवारीपासून महाराष्ट्राचं हे प्रकरण आम्ही ऐकू. व्हेलंटाईन डेचा दिवस आहे, समजून जा, सगळं काही प्रेमाने होईल.

- Advertisement -

शिवसेनेतील फुटीनंतर तयार झालेल्या ठाकरे गट आणि शिंदे गट या दोन्ही गटाने मुख्य पक्षावर आणि पक्षचिन्हावर आपला दावा केला आहे. ज्यामुळे महाराष्ट्रात आता मोठा सत्तासंघर्ष निर्माण झाला आहे. या प्रकरणावर सध्या सर्वोच्च न्यायालय आणि निवडणुक आयोगासमोर सुनावणी सुरु आहे. आज सर्वोच्च न्यायालयातही या प्रकरणावर सुनावणी पार पडली. यावेळी देशाच्या सरन्यायाधिशांनी पुढील सुनावणी थेट व्हेलंटाईन डे दिवशी अर्थात 14 फेब्रुवारी रोजी ठेवली आहे. यावर दोन्ही गटाच्या वकिलांनी हरकत न घेता मान्यता दिली आहे. मात्र ठाकरे गटाच्या 7 सदस्य खंडपीठाची मागणी अद्याप कोर्टाने मान्य केली नाही. त्यामुळे याप्रकरणावरील पुढील सुनावणी 5 सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर होणार की 7 न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर होईल हे अद्याप निश्चित झाले नाही. मात्र या संघर्षावरील सुनावणीसाठी आता फेब्रुवारीची वाट पाहावी लागणार आहे.


राज्यपालांनी पत्र लिहिण्याची जबाबदारी दुसऱ्या राजकीय नेत्याकडे दिली का? राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -