घरमनोरंजनज्येष्ठ वृत्तनिवेदक डॉ. विश्वास मेहेंदळे यांचे वयाच्या 84 व्या वर्षी निधन

ज्येष्ठ वृत्तनिवेदक डॉ. विश्वास मेहेंदळे यांचे वयाच्या 84 व्या वर्षी निधन

Subscribe

ज्येष्ठ वृत्तनिवेदक डॉ. विश्वास मेहेंदळे यांनी वयाच्या 84 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले आहे. मुलुंड येथे त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलंय. डॉ. विश्वास मेहेंदळे यांनी काही काळ महाराष्ट्र शासनासाठीही काम केले तसेच ते वृत्तनिवेदक, लेखक, अभिनेते देखील होते. त्यांनी आत्तापर्यंत जवळपास 18 पेक्षा जास्त पुस्तकांचे लेखन केले आहे. याव्यतिरिक्त ते मराठी नाट्यसृष्टीचे भाष्यकार म्हणूनही ते ओळखले जायचे.

डॉ. विश्वास मेहेंदळे यांची कारकीर्द
डॉ. विश्वास मेहेंदळे यांनी सुरुवातीच्या काळात पुण्याच्या आणि कुलाब्याच्या वेधशाळेमध्ये काही काळ नोकरी केली होती. त्यानंतर त्यांची मीडियासंबंधी कारकीर्द दूरदर्शनवर वृत्तनिवेदक म्हणून सुरू झाली. दिल्ली आकाशवाणीवरुन पहिल्या मराठी बातम्या वाचणारे ते निवेदक ठरले. तसेच ते मुंबई दूरदर्शनचे पहिले वृत्तनिवेदक देखील होते शिवाय ते महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक खात्याचे संचालकही होते. पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन विभागाचे खातेप्रमुख होते. ‘सिम्बॉयसिस इन्स्टिट्यूट ऑफ मीडिया आणि कम्युनिकेशन’चे ते संस्थापक होते.

- Advertisement -

अभिनेते आणि उत्तम लेखक
विश्वास मेहेंदळे हे मराठी नाट्यसृष्टीचे भाष्यकार आहेत. त्यांचा ‘मला भेटलेली माणसे’ हा एकपात्री कार्यक्रम विशेष लोकप्रिय ठरला होता. या शिवाय ‘अग्निदिव्य’, ‘एकच प्याला’, ‘एक तमाशा अच्छा खासा’, ‘खून पहावा करून’, ‘जर असं घडलं तर’, ‘नांदा सौख्यभरे’, ‘पंडित आता तरी शहाणे व्हा’, ‘प्रेमा तुझा रंग कसा’ यांसारख्या गाजलेल्या नाटकांमध्ये मेहेंदळे यांनी भूमिका साकारल्या होत्या.

 


हेही वाचा :

डोंबिवलीत पुस्तक आदान प्रदान सोहळा

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -