घरमनोरंजनश्रीनिवास मोहन यांची ऑस्कर अकादमीत वर्णी

श्रीनिवास मोहन यांची ऑस्कर अकादमीत वर्णी

Subscribe

व्हिज्युअल इफेक्ट क्षेत्रात बजावलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी प्रसिद्ध व्ही. एफ. एक्स तज्ज्ञ श्रीनिवास मोहन यांना ऑस्कर अकादमीने परीक्षक म्हणून आमंत्रीत केले आहे. ऑस्कर अकादमीने ५९ देशांतील नव्या सदस्यांना निमंत्रण दिले असून यात बहुतांश स्त्री सदस्यांचा समावेश आहे. या नियुक्तीबाबत स्वत: श्रीनिवास मोहन यांनी ट्विटरच्या माध्यमातून माहिती सांगितली.

- Advertisement -

श्रीनिवास मोहन यांनी  ‘बाहुबली : द बिगिनिंग’ आणि ‘२.०’ या  चित्रपटांसाठी व्हीएफएक्स विभागात उल्लेखनीय काम केले होते. तसेच ‘हिचकी’ चित्रपटासाठी  शेरी भारदा यांना निमंत्रित करण्यात आले आहे. ऑस्कर अकादमीच्या परीक्षक मंडळात नियुक्ती झाल्या बद्दल बाहुबली मालिकेचे दिग्दर्शक एस. एस. राजामौली आणि निर्माते शोबु यरलागड्डा यांनी श्रीनिवास मोहन यांचे अभिनंदन केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -