घरमुंबई'मरे'ची वाहतूक २५ ते ३० मिनिटे उशिरानं सुरू

‘मरे’ची वाहतूक २५ ते ३० मिनिटे उशिरानं सुरू

Subscribe

गर्दीची वेळ नसल्याने लोकलमध्ये बिघाड झाल्याने प्रवाशांची होणारी गैरसोय टळली

मध्य रेल्वेने रविवारच्या वेळापत्रकामुळे चालवलेली रेल्वे वाहतूकीमुळे प्रवाशांना मोठ्य़ा त्रासाला सामोरे झाले. रविवारचे वेळापत्रक लागू केल्याने प्रवाशांच्या तुलनेत लोकल फेऱ्या कमी असल्याने मध्य रेल्वेच्या स्थानकांत गर्दी पाहायला मिळाली. हा मोठा मनस्ताप सहन करावा लागलेल्या रेल्वे प्रवाशांना आजही ‘मरे’च्या विलंबाचा फटका बसला आहे.

कल्याण ते ठाकुर्ली दरम्यान तांत्रिक बिघाड

कल्याण ते ठाकुर्ली दरम्यान सीएसएमटीकडे येणाऱ्या लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर विस्कळीत होऊन त्याचा परिणाम झाला आहे.

- Advertisement -

गर्दीची वेळ नसल्याने प्रवाशांची गैरसोय टळली

या बिघाडामुळे सीएसएमटीच्या दिशेने येणाऱ्या लोकल सुमारे २५ ते ३० मिनिटे उशिराने धावत आहेत. गर्दीची वेळ नसल्याने लोकलमध्ये बिघाड झाल्याने प्रवाशांची होणारी गैरसोय टळली आहे. या विस्कळीत झालेली वाहतूक पुर्ववत होईपर्यंत प्रवाशांना वाट बघावी लागणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -