घरमनोरंजनदिवाळीच्या मुहूर्तावर नयनतारा - विघ्नेशच्या जुळ्या मुलांची पहिली झलक, फोटो पाहाचं

दिवाळीच्या मुहूर्तावर नयनतारा – विघ्नेशच्या जुळ्या मुलांची पहिली झलक, फोटो पाहाचं

Subscribe

लग्नानंतरची पहिली दिवाळी यंदा अनेक सेलिब्रिटींनी आनंदात साजरी केली. यात दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडपं नयनतारा आणि विघ्नेश यांचीही ही पहिलीच दिवाळी होती. मात्र दोघांसाठी ही दिवाळी खऱ्या अर्थाने स्पेशल होती. नयनतारा आणि विघ्नेश यांनी काही दिवसांपूर्वीच जुळ्या मुलांचं स्वागत केलं. आता स्पेशल दिवाळीच्या मुहुर्तावर जोडप्याने जुळ्या मुलांची पहिली झलक शेअर केली आहे.

नयनतारा आणि विघ्नेश यांनी 9 जून रोजी लग्न केले. लग्नानंतर अवघ्या 4 महिन्यांनंतर नयनताराने जुळ्या मुलांना जन्म दिला. यावेळी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. यामुळे 2022 ची दिवाळी ही या जोडप्यासाठी अनेक अर्थाने खास ठरली. या आनंदाच्या निमित्ताने नयनतारा आणि विघ्नेशने जुळ्या मुलांसोबतचे फोटो शेअर केले आहेत. फक्त फोटोच नाही तर त्यांनी एक खास व्हिडीओ देखील शेअर केला आहे.

- Advertisement -

नयनतारा आणि विघ्नेशने इन्स्टाग्रामवर जुळ्या मुलांचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. व्हिडीओमध्ये नयनतारा आणि विघ्नेश जुळ्या मुलांना हातात घेऊन उभे असताना दिसत आहे. आई- वडील झाल्याचा आनंद या जोडप्याच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसतोय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vignesh Shivan (@wikkiofficial)

- Advertisement -

चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव!

नयनतारा आणि विघ्नेशच्या मुलांची पहिली झलक पहिल्यानंतर चाहत्यांनाही आनंद झाला आहे. दरम्यान इंटरनेटवरील सर्वाच सुंदर व्हिडीओ असं चाहत्यांकडून म्हटल जातय. नयनतारा आणि विघ्नेश या जुळ्या मुलांवर चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव सुरु आहे. व्हिडिओवर कोणीतरी हार्ट इमोजी टाकत आपल प्रेम दाखवत आहे. तर कोणी आशीर्वाद देत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vignesh Shivan (@wikkiofficial)

लग्नाच्या चार महिन्यांनंतर नयनतारा जेव्हा आई झाली तेव्हा तिच्या प्रसूतीबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले. ज्यावर जोडप्याला स्पष्टीकरण द्यावे लागले. सर्व वादांवर स्पष्टीकरण देताना नयनतारा आणि विघ्नेश यांनी सांगितले की, त्यांनी ६ वर्षांपूर्वी नोंदणीकृत विवाह केला होता.


दिवाळी सेलिब्रेशनदरम्यान जया बच्चन पत्रकारांवर संतापल्या, पाठलाग करत म्हणाल्या…

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -