घरटेक-वेकजगभरात व्हॉट्सअॅप डाऊन, नेटकरी त्रस्त

जगभरात व्हॉट्सअॅप डाऊन, नेटकरी त्रस्त

Subscribe

मुंबई – गेल्या काही काळापासून भारतात व्हॉट्सअॅप डाऊन झालं आहे. यामुळे कोणालाच नवे मेसेज येत नाहीत. व्हॉट्सअॅप डाऊन झाल्यामुळे अनेकांनी ट्विटरवर याबाबत तक्रार केल्या आहेत. लवकलरच व्हॉट्सअॅप रिस्टॉर करण्यात येईल अशी माहिती व्हॉट्सअॅपच्या प्रवक्त्यांनी दिली आहे.


दुपारी साडेबारापासून व्हॉट्सअॅप बंद झाले आहे. आधी वेब व्हॉट्सअॅप बंद झाले होते. त्यानंतर हळूहळू मोबाईलवर व्हॉट्सअॅपवर मेसेज येणं बंद झालं. त्यामुळे नेटकऱ्यांनी इतर समाजमाध्यमातून याबाबत तक्रारी करण्यास सुरुवात केली आहे. जगभरात व्हॉट्स्ॅप बंद झाल्याने नेटिझन्सने ट्विटरसह अनेक समाजमाध्यमांवर तक्रारींचा पाऊस पाडला आहे. दरम्यान, व्हॉट्सअॅप डाऊन होण्यामागे कोणतं तांत्रिक कारण आहे याची माहिती मिळू शकलेली नाही.

- Advertisement -

सध्या सण उत्सवांचे दिवस सुरू आहेत. त्यामुळे सर्व्हरवर लोड आला असेल असं सायबर तज्ज्ञांकडून सांगण्यात येतंय. सर्व्हर ओव्हरलोड झाला की सर्व्हर क्रॅश होतो. पण सर्व्हर रिस्टोर होण्यासाठी एवढा वेळ घेणं चांगलं नाही. पुढच्या अर्ध्या तासात व्हॉट्सअॅप हे रिस्टॉर होणं गरजेचं आहे, असंही सायबर तज्ज्ञ म्हणाले.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -