घरमनोरंजनआम्ही बाई सादरकर्त्या

आम्ही बाई सादरकर्त्या

Subscribe

मराठी रंगभूमीवर नोंद घ्यावी अशा घटना घडत असल्या तरी प्रयोगांची संख्या अद्याप वाढलेली नाही. एखाददुसरं गाजलेलं नाटक शनिवार, रविवार हे दिवस वगळता अन्य दिवशी होत असतात. प्रेक्षक फिरकत नाहीत म्हणताना हे दोन दिवस सोडून कोणी प्रयोग लावायला मागत नाही. त्यातूनच आभार माणायचे झाले तर छोट्या पडद्यावर चमकलेले कलाकार जेव्हा रंगभूमीसाठी वेळ देतात, तेव्हा कुठे थोडीफार गर्दी दिसायला लागते. सध्या कलेच्या प्रांतात दोन अशा तारका आहेत की ज्यांनी अभिनेत्री म्हणून अधिक योगदान दिलेले आहे पण आता त्यांच्यात आता आणखीन एक गुण दिसणार आहे तो म्हणजे ‘आम्ही बाई सादरकर्त्या’. ‘दादा एक गुड न्यूज आहे’, ‘व्हाय सो गंभीर या?’ या येऊ घातलेल्या नाटकांचे सादरकर्ते म्हणून प्रिया बापट आणि शैला काणेकर यांनी जबाबदारी स्वीकारलेली आहे.

प्रिया, शैला यांनी नाटक, चित्रपट, मालिका या तिन्ही क्षेत्रात अभिनेत्री म्हणून अनमोल कामगिरी केलेली आहे. उमेश कामत अभिनीत ‘दादा एक गुड न्यूज आहे’ हे नाटक रंगमंचावर येत आहे. कल्याणी पाठारे लिखित अद्वैत दादरकर दिग्दर्शित या नाटकाची सादरकर्ती प्रिया आहे. ऋता दुर्गुळे, आरती मोरे, ऋषि मनोहर यांचा यात कलाकार म्हणून सहभाग आहे. ‘व्हाय सो गंभीर?’ या नाटकाची सादरकर्ती शैला आहे. गिरिश दातार लिखित या नाटकाचे दिग्दर्शन अमोल भोरबरोबर गिरिशनेसुद्धा केलेले आहे. प्रसाद कांबळीचे ‘गुमनाम है कोई’ हे नाटक रंगमंचावर येत आहे. त्यात मात्र शैला काणेकरने काम करण्याची तयारी दाखवलेली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -