घरमनोरंजनफिट राहण्यासाठी स्वप्नील जोशी शिकतोय Animal Flow Workout, काय आहेत याचे फायदे?

फिट राहण्यासाठी स्वप्नील जोशी शिकतोय Animal Flow Workout, काय आहेत याचे फायदे?

Subscribe

मराठमोळा अभिनेता स्वप्नील जोशी(Swapnil Joshi) नेहमीच स्वत:ला फिट ठेवण्यासाठी व्यायाम , प्राणायम, मेडीटेशन करताना दिसतो. आपल्या अभिनयासह स्टाईलमुळे कायम चर्चेत असणारा अभिनेता प्रचंड फिटनेस फ्रिक देखील आहे. नुकतचं स्वप्नीलने त्याच्या इंस्टाग्राम अकांऊटवर अॅनिमल फ्लो वर्कआऊट करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. प्रीति झिंटा, करिश्मा तन्ना, कतरिना कैफ सारख्या अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी हे अॅनिमल फ्लो वर्कआऊट ट्रेंड फॉलो करताना दिसत आहे. मात्र हे विचित्र नाव असणार वर्कआऊट नेमकं आहे तरी काय? आणि याचा आपल्या शरीराला कसा फायदा होऊ शकतो?; हे आपण जाणून घेऊयात.(What Is Animal Flow Workout Animal Flow workout Benifits)

स्वप्नीलने वर्कआऊटचा व्हिडिओ शेअर करत त्यााल “Animal Flow !!! Learing From My Guru !!!” असं कॅप्शन दिलं आहे. दरम्यान काही दिवसापूर्वी त्याने अॅनिमल वॉक या प्रकारातलं वर्कआऊट केलं होतं. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड हीट झाला. या व्हिडिओ दरम्यान त्याने वर्कआऊटचे फायदेही चाहत्यांना समजावून सांगितले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Swapnil Joshi (@swwapnil_joshi)

- Advertisement -

अॅनिमल फ्लो वर्कआऊट म्हणजे हा एक नवा प्रकारचा व्यायाम आहे . कोणत्याही ट्रेडिशनल वर्कआऊटपेक्षा हा अधिक प्रभावी ठरतो आणि तितकाच आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरतो. हा व्यायाम जमिनीवरच करायचा असतो. यातील महत्वपूर्ण बाब म्हणजे यासाठी कोणत्याही साधनांची गरज भासत नाही. लॉकडाऊन दरम्यान जीम बंद असल्याने अनेक सेलिब्रिटींना याचा फायदा झाला. या व्यायामातून फिटनेस आणि स्टॅमिना भरपूर प्रमाणात प्राप्त होत असल्याने हा वर्कआऊट अनेकजण फॉलो करताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Swapnil Joshi (@swwapnil_joshi)

- Advertisement -

वर्कआऊट करताना अशी घ्या काळजी

अॅनिमल फ्लो वर्कआऊट दिसायला जरी सोपा असला तरी एक्सपर्ट, फिटनेस ट्रेनर कडूनच तुम्ही हा प्रकार शिकून घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानूसार प्रत्येक स्पेप्स फॉलो करा

या व्यायामाची सुरूवात करताना पहिल्यांदा फक्त 5 मिनिटांसाठी हा व्यायाम करा आणि त्यानंर कालांतराने याची वेळ वाढवत न्या. 10 ते 15 मिनिटांसाठी अॅनिमल वॉक , अॅनिमल फ्लो करा.

अॅनिमल फ्लो वर्कआऊटचे फायदे

अॅनिमल फ्लो वर्कआऊट नियमित केल्यास शरीरातील स्नायू आणि सांधे मजबूत होतात.

शरीराची लवचिकता आणि गतिशीलता वाढवायची असेल तर याचा फायदा नक्की होतो.

फिटनेस मिळवणे, स्टॅमिना वाढवणे याचे मुख्य फायदे.


हे हि वाचा – Controversial Web Series 2021: तांडवपासून पाताल लोकपर्यंत २०२१च्या वादग्रस्त वेब सीरीज

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -