घरमनोरंजन१४ वर्षांनंतर 'बंटी और बबली' पुन्हा चाहत्यांच्या भेटीला येणार

१४ वर्षांनंतर ‘बंटी और बबली’ पुन्हा चाहत्यांच्या भेटीला येणार

Subscribe

अभिनेत्री राणी मुखर्जी आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या बंटी और बबली चित्रपटाने प्रेक्षकांची मनं चोरली होती.

तब्बल १४ वर्षांनंतर बंटी और बबली चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. गली बॉय फेम अभिनेता सिद्धार्थ चतुर्वेदी आणि अभिनेत्री शर्वरी या बंटी और बबलीच्या माध्यमातून एकत्र दिसणार आहेत. १४ वर्षांपूर्वी अभिनेत्री राणी मुखर्जी आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या बंटी और बबली चित्रपटाने प्रेक्षकांची मनं चोरली होती. आता नवीन बंटी और बबली काय करणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. दरम्यान नुकतीच यशराज फिल्मस् च्या टीमने या ‘बंटी और बबली २’ या चित्रपटाची घोषणा केली आहे.

- Advertisement -

दरम्यान यशराज फिल्म निर्मीत ‘बंटी और बबली’ या चित्रपटातू अभिनेत्री शर्वरी बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे. या चित्रपटात ती अभिनेता सिद्धार्थ सोबत दिसणार आहे. अनेक हिट चित्रपटांमध्ये सहायक दिग्दर्शकाचं काम केलेला वरूण शर्मा ‘बंटी और बबली २’ या चित्रपटाचंसुद्धा दिग्दर्शन करणार आहे. यापूर्वी वरूणने ‘सुलतान’, ‘टायगर जिंदा है’ यासारख्या मोठ्या चित्रपटांमध्ये सहायक दिग्दर्शक म्हणून काम पाहिलं आहे.

- Advertisement -

यशराज फिल्म्सकडून चित्रपटाची घोषणा

१४ वर्षांपूर्वी बंटी और बबली या चित्रपटाद्वारे अभिनेत्री राणी मुखर्जी आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांनी प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले होते. तेव्हा चित्रपटातील गाणी प्रचंड हिट ठरली होती. त्या चित्रपटात अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन यांनी आयटम साँग देखील सादर केले होते. दरम्यान आज यशराज फिल्म्सच्या टीमने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून चित्रपटाची घोषणा केली आहे. यावेळी नवीन बंटी आणि बबलीचा फोटो पोस्ट करण्यात आला. त्यामुळे हे नवीन बंटी बबली चाहत्यांचे किती मनोरंजन करतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हेही वाचा – हृतिक-दीपिकाचा ‘तो’ व्हिडिओ वादात; ट्विटरवर Shame on ट्रेडिंग!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -