घरमनोरंजनहृतिक-दीपिकाचा 'तो' व्हिडिओ वादात; ट्विटरवर Shame on ट्रेडिंग!

हृतिक-दीपिकाचा ‘तो’ व्हिडिओ वादात; ट्विटरवर Shame on ट्रेडिंग!

Subscribe

सध्या ट्विटरवर shame on हृतिक आणि दीपिका हे ट्रेण्ड होत आहे. या व्हिडीओत हृतिक रोशन अभिनेत्री दीपिका पदुकोणला पेस्ट्री भरवताना दिसत आहे. एका पार्टितला हा व्हिडीओ आहे. २ दिवसांपूर्वी याच पार्टीतला या दोघांचा एक फोटो व्हायरल झाला होता. या फोटोनंतर या दोघांनी एकत्र चित्रपट करावा अशी मागणी चाहत्यांनी केली. मात्र त्याच पार्टीतल्या या व्हिडीओनंतर ‘Shame on हृतिक आणि दीपिका’ हा हॅशटॅग ट्वीटरवर ट्रेण्ड होत आहे.

- Advertisement -

सध्या देशात जे काही सुरू आहे त्याबद्दल हृतिक आणि दीपिकाला अजिबात सोयर सुतक नाही असं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. तर एकीने देश जळतोय पण हृतिक-दीपिकाला पार्टीच पडलय, हे दोघही पार्टीत खूप धम्माल करत आहे असे नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

 

शनिवारी रात्री म्हणजेच १४ डिसेंबरला अरमान जैनचा रोका सेरेमनीला बॉलिवूडच्या स्टारर्सनी हजेरी लावली होती. कपूर घराण्यातील या समारंभाला दीपिका पदुकोण,हृतिक रोशन,अनिल कपूर,अनन्या पांडे,भूमी पेडणेकर,रवीना टंडन,तबू,तापसी पन्नू,राधिका आपटे अशा स्टार्सनी हजेरी लावली होती. यावेळी यांनी अनेक फोटोही काढले.

यावेळी हृतिक आणि दीपिकाचा एक सेल्फी सोशलमिडीयावर तुफान व्हायरल झाला. आणि चाहते या दोघांनी एकत्र चित्रपट करावा अशी मागणी करू लागले. त्याचबरोबर त्या दोघांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यात हृतिक रोशन तीला केक भरवताना दिसत आहे. कारण आजपर्यंत या दोघांनी एकही प्रोजेक्ट एकत्र केलेला नाही. हे दोघं एकत्र खूप सुंदर दिसत असल्यामुळे चाहत्यांनी आता या दोघांना एकत्र कास्ट करावं अशी मागणी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -