घरताज्या घडामोडीएकनाथ खडसे पक्ष सोडण्याच्या तयारीत; राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची दाट शक्यता

एकनाथ खडसे पक्ष सोडण्याच्या तयारीत; राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची दाट शक्यता

Subscribe

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा नवा भूकंप होण्याची दाट शक्यता आहे. कारण भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे पक्षाला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. १२ डिसेंबर रोजी बीड येथे भाजपचे दिवंगत ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती निमित्ताने आयोजित मेळाव्यात खडसे यांनी भाजप पक्षातील नेत्यांविरोधात भाषण केले होते. तिथे बोलताना त्यांनी ‘पंकजा पक्ष सोडणार नाहीत. मात्र माझं माहिती नाही’, असे सूचक वक्तव्य खडसे यांनी केले होते. तेव्हापासून खडसे भाजपला सोडचिठ्ठी देऊन दुसऱ्या पक्षात जातील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती.


हेही वाचा – कितीही विरोध करा, कायदा बदलणार नाही – अमित शहा

- Advertisement -

 

रात्री नऊ वाजता खडसे-पवार-ठाकरे बैठक

एकनाथ खडसे सध्या नागपुरात दाखल झाले आहेत. आज रात्री नऊ वाजता खडसे यांची राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक आहे. या बैठकीनंतर खडसे कोणत्या पक्षात जातील हे स्पष्ट होण्याची शक्यता आहे. दरम्यान, एकनाथ खडसे भाजपला सोडचिठ्ठीला देऊन राष्ट्रवादी किंवा शिवसेना पक्षात प्रवेश करणार, अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ‘हे तर मगरमच्छचे अश्रू’; जयंत पाटील यांचा विरोधकांवर हल्लाबोल


२० डिसेंबरला खडसे यांचा पक्षप्रवेश होण्याची शक्यता

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ खडसे यांचा २० डिसेंबर रोजी राष्ट्रवादीत पक्षप्रवेश होणार आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती अगोदर खडसे यांनी शरद पवार यांची मुंबईत भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची देखील भेट घेतली होती. राष्ट्रवादी छगन भुजबळ यांना कठिण परिस्थितीत पाठिमागे उभी राहिली तशीच साथ खडसे यांना देणार असे अश्वासन खडसेंना मिळाले आहे. त्यामुळे ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहेत.

पक्षप्रवेशामुळे राष्ट्रवादीचा खडसेंना फायदा तर भाजपला तोटा

एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला तर त्याच सर्वात मोठा तोटा पक्षाला बसणार आहे. भाजप पक्षात विशेषत: खान्देशात खडसे समर्थकांचा एक वेगळा असा गृप आहे. याशिवाय खडसे हे ओबीसी समाजाचा चेहरा असलेले मोठे नेते आहेत. त्यामुळे त्याचा फटका भाजपला बसेल आणि निश्चितच तितकाच फायदा राष्ट्रवादीला होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -