घरदेश-विदेशपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परदेश दौऱ्यावर २८० मिलियन खर्च

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परदेश दौऱ्यावर २८० मिलियन खर्च

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या परदेश दौऱ्याच्या खर्चाचा तपशील आता सादर करण्यात आला आहे. ८४ देशांच्या दौऱ्यासाठी आत्तापर्यंत २८० मिलियन खर्च करण्यात आले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ पासून आत्तापर्यंत ८४ देशांचा दौरा केला. दरम्यान, मोदींच्या या परदेश दौऱ्यांबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. शिवाय, होणाऱ्या खर्चाबाबत देखील अनेक सवाल उपस्थित केले गेले. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या परदेश दौऱ्याच्या खर्चाचा तपशील आता सादर करण्यात आला आहे. ८४ देशांच्या दौऱ्यासाठी आत्तापर्यंत २८० मिलियन खर्च करण्यात आले आहेत. परराष्ट्र मंत्रालयानं याबाबतची माहिती जाहीर केली आहे. यामध्ये विमान खर्चासह, सुरक्षेचा तपशील देखील देण्यात आला आहे. परदेश दौऱ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिका, जपान, चीन ऑस्ट्रेलियासह ८४ देशांना भेटी दिल्या. त्यावर अनेक वेळा टिका देखील झाली. केवळ हौस म्हणून पंतप्रधान नरेंद्र परदेश दौरे करतात. त्यांच्या दौऱ्यावर आत्तापर्यंत किती खर्च झाला? असे अनेक प्रश्न विचारले गेले. त्यावर आता परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्टीकरण दिलं आहे.

दरम्यान, पंतप्रधानपदी निवड झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परदेश दौऱ्यावर भर देत भारताचे संबंध आंतरराष्ट्रीय पातळीवर घट्ट करण्याचे प्रयत्न केले. शिवाय, परकीय गुंतवणूक भारतामध्ये आणण्याच्या धोरणाचा देखील हा एक भाग असल्याचं परराष्ट्र धोरण विश्लेषकांचं म्हणणं आहे.

वाचा – पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परदेश दौऱ्याचा खर्च १४८४ कोटी रूपये!!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -