घरमहाराष्ट्रक्षुद्र असल्याचं तटकरे म्हणतात पण...; आव्हाडांनी तटकरेंना करून दिली 'ती' आठवण

क्षुद्र असल्याचं तटकरे म्हणतात पण…; आव्हाडांनी तटकरेंना करून दिली ‘ती’ आठवण

Subscribe

राष्ट्रवादीचे आमदार (शरद पवार गट) जितेंद्र आव्हाड यांनी सुनिल तटकरे यांचा समाचार घेतला आहे. त्यांनी काही गोष्टींची आठवण करुन देत त्यांना खरी खोटी सुनावली आहे.

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना म्हटलं की, मी क्षुद्र असल्यानं मला टार्गेट केलं जात आहे. त्यांच्या या विधानावर आता राष्ट्रवादीचे आमदार (शरद पवार गट) जितेंद्र आव्हाड यांनी सुनिल तटकरे यांचा समाचार घेतला आहे. त्यांनी काही गोष्टींची आठवण करुन देत त्यांना खरी खोटी सुनावली आहे. (NCP MLA Sharad Pawar Group Jitendra Awhad has taken notice of Sunil Tatkare statement He reminded them of some things )

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, मी क्षुद्र असल्याने सुप्रिया सुळे टीका करत असतील, असं तटकरे म्हणाले. परंतु त्यांनी हे बोलताना जरा मागे वळून बघितलं असतं तर तुम्हाला जी पद मिळाली ती चांगल्या चांगल्या घराण्यातल्या लोकांना मिळाली नाहीत. अदिती तटकरेंना जिल्हापरिषदेचे अध्यक्ष म्हणून शेकापने साहेबांच्या शब्दामुळे बनवलं. तुम्हाला मंत्रिपद, पुतण्या, मुलगा, भाऊ, सगळ्यांना आमदारकी दिली तुम्हाला खासदारकी दिली. मला न देता तुमच्या मुलीला पालकमंत्री पद दिलं.

- Advertisement -

तुम्ही असं करायला नको होतं- आव्हाड

आव्हाड म्हणाले की, बाबासाहेब पुरंदरेंनी कुणब्यांविषयी वाईट लिहिलं होतं. तेव्हा मी विरोध केला होता. तुम्ही विरोध तर केलाच नाही उलट मला वक्तव्य मागे घेण्यासाठी दम दिलात. पवार साहेबांशी बोललो आणि त्यांनी माझं वक्तव्य मागे घेतलचं पाहिजे असं नाही असं सांगितलं. मी कायम बोललो आहे मी क्षुद्र आहे. मला त्याचा अभिमान आहे. क्षुद्र म्हणजे काय ते आधी समजून घेतलं पाहिजे. जातीय जनगणनेसाठी क्षुद्रांसाठी उभे राहावे लागेल. तुम्ही कधीही न वापरलेलं शस्त्र वापरलं आणि आता तुम्ही ते वापरायला नको होतं.

आव्हाड म्हणाले की, खऱ्या अर्थाने कोणाला आरक्षणाची गरज असेल तर ती वंचित समजाला आहे. आरक्षण म्हणजे तुमच्या आर्थिक उन्नतीचे साधन नाही. हे बाबासाहेबांनी सांगितलं होतं. गावच्या सीमेबाहेर राहणाऱ्या लोकांसाठी आरक्षण होतं त्या लोकांना बाबासाहेबांनी माणसांत आणलरं. जगातील प्रत्येक राष्ट्रात आरक्षण आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे. जाती जातीत भांडणं लावणं योग्य नाही.

- Advertisement -

(हेही वाचा: …आणि त्यांच्यातील बंड मेलेले असते, मोफत रेशन योजनेवरून केंद्रावर आव्हाडांची टीका )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -