घरफिचर्सजैतापूर, नाणार घातक प्रकल्प का नकोत

जैतापूर, नाणार घातक प्रकल्प का नकोत

Subscribe

१० वर्षे होऊन गेली तरी जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचे बांधकाम सुरु होऊ शकलेले नाही. नुसते कंपाऊंड झाले आहे. दिवाळखोरीत निघालेल्या कंपन्या, न परवडणारा भांडवली खर्च, न परवडणारा विजेचा दर, कुठेही सुरु नसलेला ई पी आर तंत्रज्ञानाचा अणु प्रकल्प , अपघातानंतर उत्तरदायित्वाचा प्रश्न आदी अनेक कारणांमुळे प्रकल्प रखडला आहे. जनतेवर दडपशाही करून जबरदस्तीने भू संपादन केल्याने वाईट प्रकल्प चांगला होत नाही, हे शासनाने व कोकणातील जनतेने समजून घेतले पाहिजे. जमिनीच्या संपादनाचा आणि प्रकल्पाच्या विनाशकारितेचा काहीही संबंध नसतो.

कोकणाच्या निसर्गाची व कोकणी माणसाची धूळधाण करून भांडवलदारांची तुंबडी भरण्याकरिता शासनाने जैतापूर अणुऊर्जा आणि नाणार रिफायनरीसारखे विध्वंसक प्रकल्प प्रस्तावित केले आहेत. कोकणाचे अस्तित्वच संपवू पाहणारे हे प्रकल्प लवकरात लवकर हद्दपार करणे भागच आहे.या प्रकल्पांमुळे होणार्‍या गंभीर परिणामाची माहिती घेऊया

१. रिफायनरी प्रकल्पाकरिता सुमारे १४५०० एकर जमिनीवर बुलडोझर फिरवून सपाटीकरण केले जाणार आहे. त्यामुळे त्या आपल्या जमिनीवरील पूर्वजांकडून आपल्याला मिळालेली घरे, सुपीक शेती, अनेक प्राचीन स्वयंभू जागृत मंदिरे, ऐतिहासिक वारसा सांगणारे पाणवठे, विहिरी, बागायती, घनदाट जंगले नष्ट केली जातील.

- Advertisement -

२. ओढे, तलाव, विहिरी, पाणवठे, जांभ्या खडकाची सच्छिद्र पाणी साठविण्याची व्यवस्था नष्ट होईल.

३. विजयदुर्ग खाडी व अरबी समुद्र पाण्याखालून जाणार्‍या पाईपलाईन्सच्या गळतीने तसेच तेलवाहू जहाजांच्या ट्रॅफिकने प्रदूषित होऊन, मासेमारी व समुद्री जीव यांचेवर गंभीर परिणाम होतील.

- Advertisement -

४. परिसरातील आंबा, काजूच्या बागायती तसेच नारळ, कोकम आदी उत्पादने रिफायनरीच्या प्रदूषणामुळे लोप पावतील.

५. या प्रकल्पातून बाहेर पडणारा विषारी वायू मानवी जीवनाला आणि आरोग्याला दीर्घ काळ विपरीत परिणामकारक ठरणारा असेल. हृदयविकार, दमा, शरीरात दूषित रक्त तयार होणे, त्वचारोग, फुफ्फुसांचे विकार, कॅन्सर इत्यादी भयंकर जीवघेण्या आजारांचा सामना करावा लागेल. शिवाय आगामी पुढच्या पिढ्यांनाही याचे दूरगामी परिणाम भोगावे लागतील.

६. प्रकल्पातून निघणार्‍या सल्फरडाय ऑक्साईड या वायू पावसाच्या पाण्यात विरघळून रसायनयुक्त पाऊस (अ‍ॅसिड पाऊस) पडू शकतो. तसे झाल्यास जमिनीचा कस आणि सुपीकता यांच्या गुणवत्तेवर निश्चित परिणाम होऊन मानवी जीवनासह संपूर्ण सजीव सृष्टीला महाभयंकर संहाराला सामोरे जावे लागेल.

७. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प हा भूकंप प्रवण क्षेत्रात येतो. माडबनच्या पठाराखालून भूभ्रंश रेषा जात आहे. अपघात झाला तर संपूर्ण कोकण, गोवा, पश्चिम महाराष्ट्राला त्याचा धोका आहे.

८. दररोज ५२०० कोटी लिटर गरम पाणी समुद्रात सामान्य तापमानापेक्षा ७ डिग्रीहून अधिक तापमानाला सागरात सोडल्याने समुद्री जीवांचा नाश होऊन मासेमारीही संपुष्टात येईल.अणुऊर्जा परिसारात मच्छिमारी प्रतिबंधित क्षेत्र असते.

९. सामान्यरित्या सुरु असलेल्या अणुऊर्जा प्रकल्पातून देखील किरणोत्सार बाहेर निघत असतो.एखादी किरणोत्सार गळतीची अफवा देखील राजापूर-देवगडच्या आंब्याची बाजारपेठ संपवू शकते.

१०. किरणोत्सरामुळे कर्करोग, मतिमंद मुले जन्माला येणे, स्त्रियांच्या गर्भाशयाचे आजार, त्वचारोग आदी भयानक रोग होऊन पुढच्या पिढ्या बरबाद होतात.

११. आज १० वर्षे होऊन गेली तरी जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचे बांधकाम सुरु होऊ शकलेले नाही. नुसते कंपाऊंड झाले आहे. दिवाळखोरीत निघालेल्या कंपन्या, न परवडणारा भांडवली खर्च, न परवडणारा विजेचा दर, कुठेही सुरु नसलेला ई पी आर तंत्रज्ञानाचा अणु प्रकल्प, अपघातानंतर उत्तरदायित्वाचा प्रश्न आदी अनेक कारणांमुळे प्रकल्प रखडला आहे.
जनतेवर दडपशाही करून जबरदस्तीने भू संपादन केल्याने वाईट प्रकल्प चांगला होत नाही, हे शासनाने व कोकणातील जनतेने समजून घेतले पाहिजे. जमिनीच्या संपादनाचा व प्रकल्पाच्या विनाशकारितेचा काहीही संबंध नसतो.

१२.प्रकल्पाच्या निमित्ताने निर्माण केली जाणारी बेसुमार बांधकामे, प्रदूषण, वाढलेले तापमान, निसर्ग साधनसामुग्रीचा होणारा र्‍हास यामुळे कोकणातील प्रमुख पर्यटन व्यवसायच धोक्यात येऊ शकतो. त्यामुळे रोजगाराच्या संधी गमावलेला कोकणी माणूस देशोधडीला जाण्यास वेळ लागणार नाही.

१३. या प्रकल्पात रोजगाराच्या निमित्ताने बाहेरून येणारी परप्रांतीय माणसे ज्यांना कोकणाच्या सांस्कृतिक जीवनाबाबत कसलीही आस्था नाही अशा माणसांच्या बेजबाबदार वागण्याचे सांस्कृतिक जीवन धोक्यात येईल.अणुऊर्जा आणि रिफायनरीसारख्या विनाशकारी प्रकल्पांचे दुष्परिणाम जाणून घेतल्यानेच कोकणी माणूस प्रकल्पाविरोधात संघर्ष करीत आहे.


सत्यजित चव्हाण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -