घरफिचर्ससारांश‘बिझिनेस डेटा एनेलेटिक्स’ : सोन्याची अंडी देणारी कोंबडी

‘बिझिनेस डेटा एनेलेटिक्स’ : सोन्याची अंडी देणारी कोंबडी

Subscribe

ऊर्जा व्यवस्थापन, ई-कॉमर्स पर्सनलायझेशन, रिस्क फॅक्टर एनेलिसेस, कार्यक्षमता व प्रभाव म्हणजे इम्पॅक्ट एनेलेसिस, क्वालिटी कंट्रोल, लॉजिस्टिक आणि वाहतूक, कार्यक्षमतेत वाढीसाठी ग्राहक तसेच कर्मचारी यांच्यावर एनव्हार्मेंट चेंज इम्पॅक्ट व इंप्रेशन आदी असंख्य क्षेत्रांत सोन्याची अंडी देणारी कोंबडी असलेले ‘बिझनेस डेटा एनेलेटिक्स’चे टेक्नॉलॉजी स्टॅटेजिक सोल्जर्स हे वरदान ठरले आहेत. म्हणूनच कुबेरी खजान्याचे दिशादर्शक होकायंत्र आहे ‘बिझिनेस डेटा एनेलेटिक्स!’

–*प्रा. किरणकुमार जोहरे*

*‘बीडीए’चा उपयोग आणि पैशांचा पाऊस!*
तुकड्यातुकड्यांतील माहितीचा डोंगर उपसत एखाद्या गोष्टीची खातरजमा (व्हॅलिडेशन) करण्यासाठीदेखील बीडीए हे क्षेत्र उपयुक्त ठरते. ‘बिझनेस डेटा एनेलेटिक्स’ (बीडीए) मध्ये विविध उद्योगांमध्ये वास्तवात आणि व्यावहारिक पुणे उपयोग करण्यासाठी वापरले जाते.

- Advertisement -

*परफोर्मन्स एनेलेसिस:*
मानव संसाधने म्हणजे ह्युमन रिसोर्स हा कुठल्याही संस्थेचा प्राणवायू होय, तर सुयोग्य लोकांना संधी म्हणजे निरोगी व दीर्घायुष्य जीवन होय. एचआर डेटाचे विश्लेषण यामुळे अत्यंत महत्त्वाचा पहिला टप्पा होय. आपल्या स्वतःच्या कंपनी अथवा संस्थेतील दिव्याखालचा अंधार पाहू शकणारी संस्था नेहमीच उजेडाचा हव्यास घेत प्रकाशमान व दैदिप्यमान कामगिरी करू शकते. एखाद्या कर्मचार्‍यांची कामगिरी कशी आहे, त्याला प्रमोशन द्यावे का, उत्तम प्रतिभा असलेल्या व्यक्तीला डावलून चुकीच्या व्यक्तीला वरिष्ठ पदावर ठेवल्यास संस्थेला किती नुकसान होईल, जनमानसात चुकीचा संदेश गेल्यास संस्थेचा ब्रांड किंवा प्रतिमा किती मलिन होईल, व्यवस्थापनात सुयोग्य व्यक्तींना कोणती जबाबदारी केव्हा द्यावी, चांगल्या व्यक्ती संस्थेत टिकून रहावा यासाठी कोणते उपाय करावेत, इतर प्रतिस्पर्ध्याला आपल्या कंपनीतील अथवा समूहातील सेट असलेली माणसे पळविण्यासाठी संधी कशी देता येणार नाही आदींबाबत धोरणात्मक निर्णय व कृती करण्यासाठी डेटा मेट्रिक्स एनेलेसिस व परफोर्मन्स तुलनात्मक चार्ट बनवत कर्मचार्‍यांच्या कामगिरीचे विश्लेषण आणि अचूक उत्पादकतेचे मूल्यांकन करणे शक्य होते.

*ग्राहक विश्लेषण:*
संस्थेचे ग्राहक कोण, कसे, का, त्यांची अपेक्षा आपण कशी व किती पूर्ण करतो हादेखील अत्यंत महत्त्वाचा टप्पा होय. मार्केटिंग म्हणजे विपणन धोरणात सुधारणा करण्यासाठी तसेच ग्राहकांचे समाधान वाढविण्यासाठी ग्राहकाचे वर्तन, प्राधान्ये आणि खरेदीचे नमुने समजून घेण्यासाठी महत्वपूर्ण ठरते.

- Advertisement -

*विक्री भविष्य:*
भविष्यातील विक्रीच्या ट्रेंडचा अंदाज लावणे तसेच इन्व्हेंटरी व्यवस्थापन व उत्पादन नियोजन, उपलब्ध साधनांचा पुरेपूर म्हणजे ऑप्टिमाईझ वापर करण्यासाठी डेटा आणि मागणी-पुरवठ्याच्या आधारावर विक्री भविष्य ठरविण्यासाठी उपयुक्त आहे.

*मार्केटिंग विभागणी:*
मार्केटिंग मोहिमा तसेच प्रमोशन, उत्पादन ऑफर तयार करण्यासाठी लोकसंख्याशास्त्र, वर्तन किंवा इतर घटकांच्या आधारावर बाजारपेठेची विभागणी करण्यासाठी अत्यंत उपयोगी आहे.

*रिअल-टाईम एनेलेसिस:* तात्काळ निर्णय घेण्यासाठी स्टॉक ट्रेडिंग किंवा वेबसाईट ट्रॅफिक विश्लेषण यासारख्या रिअल-टाईममध्ये डेटाचे निरीक्षण करणे आणि प्रतिसाद अत्यंत महत्त्वाचा ठरतो.

*आव्हानांवर उपाय:*
विविध सेवा तसेच एखादी व्यक्ती सदस्यत्व म्हणजे त्या सेवा किंवा उत्पादनाची मेंबरशीप का सोडत आहे यांच्या कारणांचा शोध, जोखमीचे निर्णय, एखादा घटक किती बदलल्यानंतर त्याचा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह होणार्‍या परिणामाची परीसिमा किंवा लिमिट, नवीन ग्राहकांना शोधण्यासाठी पर्याय विकास, कंपन्यांना आपले कर्मचारी टिकवून ठेवण्यासाठी करावयाच्या ठोस उपाययोजना अशा एक ना दोन अनेक आव्हानांवर उपाय करण्यासाठी महत्त्वाचे आहे.

*गुन्हेगारी शोध:*
फॉरेन्सिक सायन्स, सायबर क्राईम, इंटरनेट फ्रॉड आदी अनेक गुन्हेगारी शोधत ती रोखण्यासाठी तात्काळ, दीर्घकाळ कारगीर साबित होतील असे उपाय करण्यासाठी तसेच सामान्य नमुने किंवा विसंगत डेटाचे विश्लेषण करून फसव्या गोष्टींना शोधणे आणि त्यावर नियंत्रण मिळवता कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी उपयुक्त ठरते.

*सप्लाय चेन ऑप्टिमायझेशन:*
ऑपरेशन्स सुव्यवस्थित करण्यासाठी, खर्च कमी करण्यासाठी आणि वितरण व्यवस्था सुधारण्यासाठी पुरवठा साखळी डेटाचे विश्लेषण करणे.

*आर्थिक व वित्तीय विश्लेषण:*
कंपनीच्या आर्थिक व वित्तीय परिस्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी, गुंतवणुकीचे निर्णय घेण्यासाठी आणि आर्थिक डेटाचे विश्लेषण करीत जोखीम व्यवस्थापित करण्यासाठी उपयोगी आहे.

*अ-ब-क प्लॅन चाचणी:*
व्यवसाय आणि इतरही अनेक गोष्टींत विविध रणनीती किंवा उत्पादनातील फरकांच्या परिणामकारकतेची तुलना करण्यासाठी प्रयोग आयोजित करणे, व्यवसायांना डेटा-बॅक्ड निर्णय घेण्यास मदत करणे यासाठी अ, ब आणि क तसेच प्रसंगी ड प्लॅन व तो कोणत्या परीस्थितीत वापरायचा हे ‘बिझनेस डेटा एनेलेटिक्स’ अचूक रस्ता दाखवते.

*सोशल मीडिया एनेलेटिक्स:*
ग्राहकांच्या भावना समजून घेण्यासाठी, ब्रँडच्या प्रतिष्ठेचा मागोवा घेण्यासाठी आणि त्यानुसार मार्केटिंग धोरणे राबविण्यासाठी सोशल मीडिया डेटाचे विश्लेषण करणे.

*हेल्थकेअर एनेलेटिक्स:*
आरोग्यसेवा परिणाम सुधारण्यासाठी, रुग्णालयातील ऑपरेशन्स ऑप्टिमाईझ करण्यासाठी आणि रोग व्यवस्थापनातील ट्रेंड ओळखण्यासाठी रुग्णाच्या डेटाचा वापर करणे यासाठी उपयुक्त ठरते.

याशिवाय ऊर्जा व्यवस्थापन, ई-कॉमर्स पर्सनलायझेशन, रिस्क फॅक्टर एनेलिसेस, कार्यक्षमता व प्रभाव म्हणजे इम्पॅक्ट एनेलेसिस, क्वालिटी कंट्रोल, लॉजिस्टिक आणि वाहतूक, कार्यक्षमतेत वाढीसाठी ग्राहक तसेच कर्मचारी यांच्यावर एनव्हार्मेंट चेंज इम्पॅक्ट व इंप्रेशन आदी असंख्य क्षेत्रांत सोन्याची अंडी देणारी कोंबडी असलेले ‘बिझनेस डेटा एनेलेटिक्स’चे टेक्नॉलॉजी स्टॅटेजिक सोल्जर्स हे वरदान ठरले आहेत. म्हणूनच कुबेरी खजान्याचे दिशादर्शक होकायंत्र आहे ‘बिझिनेस डेटा एनेलेटिक्स!’

–*(लेखक विज्ञान व तंत्रज्ञानाचे अभ्यासक आहेत.)*

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -