घरफिचर्ससारांश‘एलियन्स’चा वास्तवाभास !

‘एलियन्स’चा वास्तवाभास !

Subscribe

1902 मध्ये जॉर्जेस मेलिएसच्या ‘अ ट्रीप टू द मून’मध्ये एलियन्स पहिल्यांदा स्क्रीनवर दिसले. एलियनने पृथ्वीवर हल्ला केला आहे आणि त्यातून केवळ अमेरिकाच जगाला वाचवू शकते, अशा थिमचे किमान एक हजार चित्रपट हॉलीवूडमध्ये बनले. जगभर वितरित होणारे एलियन्सवरील चित्रपट हा निव्वळ योगायोग समजून घ्यावा का? एलियन्स पृथ्वीवरील सर्व माणसांना गुलाम बनवून टाकणार, पृथ्वीवरील लोकसंख्या नियंत्रणासाठी एलियन्स पृथ्वीवरील लोकांना पकडून मंगळावर नेणार, पृथ्वीवर लवकरच मंगळवासी हल्ला करतील, एलियन्स ऑल रेडी पृथ्वीवर दाखल झाले आहेत आणि समुद्रात लपून बसले आहेत असे एक ना दोन अनेक भीतीदायक तर्कवितर्क जगभर मांडले जात आहेत.

15 ऑगस्ट 2022 रोजी भारतात स्वातंत्र्य दिनाचे ध्वज फडकत अमृत महोत्सव साजरा होत असताना जगभरातील मीडियामध्ये एलियन्स विषयी बातम्यांचे मथळे झळकत होते. विशेष म्हणजे संपूर्ण पृथ्वी पारतंत्र्यात जाईल की काय असा इशारा कुणी तरी देत होते. आपण स्वत: एलियन असल्याचा आतापर्यंत तीनवेळा दावा केला. सुमारे एक डझन गर्लफ्रेंड बरोबर डेंटीग करणारा व दोन विवाह तसेच 10 अपत्यांचा बाप असलेला व 6 कंपन्यांचा मालक जो जगातील एक सर्वात धनवान व सनकी व्यक्ति आहे, तो नेहमीप्रमाणे हा वादग्रस्त दावा करीत होता. स्वत:चे घर खरेदी न केलेला व आईला गॅरेजमध्ये झोपायला लावणारा तरी संपूर्ण मानवजातीला वाचविण्यासाठी मंगळावर मानवी वस्तीसाठी झटणार्‍या टेस्ला कंपनीचा सर्वेसर्वा इलॉन मस्कने स्पष्ट सांगितले आहे की, जर एलियन्स पृथ्वीवर आले तर ते आपल्यासाठी खूपच धोकादायक असणार आहे.

त्याआधी 24 जुलै 2022 रोजी आलेल्या बातम्यांत मंत्रमुग्ध करणारी दृश्य म्हणजे रेडीटवर शेअर केलेल्या पोस्टनुसार पॅसिफिक महासागरावर उड्डाण करणार्‍या वैमानिकाला एक भयानक लाल चमकणार्‍या प्रकाशांचे आकाशात तरंगणारे भयावह तेजोपुंज दिसल्याच्या व्हिडीने जगभर खळबळ माजवली होती. लाइव्ह मिंटमधील एका अहवालानुसार, नोबल पुरस्कार विजेते फर्मी पॅराडॉक्स सिद्धांताचा संदर्भ देत इलॉन मस्कने दावा केला की, एलियन्स अस्तित्वात नसतील तर मानव सर्वात शक्तिशाली आहे. हा सिद्धांत एलियन्सच्या अस्तित्वावर विश्वास ठेवतो. या सिद्धांतानुसार एलियन्स या पृथ्वीवर फार पूर्वी आले होते.

- Advertisement -

7 वर्षांपूर्वी म्हणजे 2015 साली प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ स्टिफन हॉकिंग यांनी ‘हॉकिंग ब्रेक थ्रू लिसन प्रोजेक्ट’ मध्ये एलियन शोधण्याचे समर्थन करतानाच एलियन्सशी संपर्क हे मानवजातीला युद्धाने एलियन्स हे एखाद्या किड्यामुंग्याप्रमाणे संपवून टाकतील असा धोक्याचा इशारादेखील दिला होता. बायबल प्रकटीकरण 16:1-21 मध्ये पृथ्वी एलियन्सचा मानवजातीवर हल्ला झाल्यावर कसा त्राहिमाम माजेल याचे वर्णन दिले आहे. तसेच अमेरीकन पूर्व सल्लागारानेदेखील दावा केला की अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ड्वाइट आयझेनहॉवर 1954 मध्ये न्यू मेक्सिकोच्या विमानतळावर एलियन्सशी किमान तीन वेळा भेटले होते. विशेष म्हणजे 7 मे 2022 रोजी एक खळबळजनक फोटो आणि बातमी आली होती. मंगळ ग्रहावर डोंगर कापून दरवाजे बनले आहेत की काय असे फोटो अमेरिकेच्या नासा या संस्थेने प्रसारीत केले. जगभरातील मीडियामध्ये मंगळावरून लवकरच एलियन पृथ्वीवर येतील अशा बातम्यांचा महापूर आला नसता तरच मग नवल म्हणावे लागेल. एरिक वॉन डॅनिकेन या जर्मन संशोधकाने ‘चॅरेटस ऑफ गॉड, अनसोल्व्ड मिस्ट्रीज ऑफ पास्ट’ हे उत्कंठावर्धक पुस्तक 1968 साली लिहिले आणि जगभर खळबळ माजली.

विश्वाच्या पसार्‍यात केवळ पृथ्वी हा एकमेव ग्रह असा आहे की, ज्यावर सजीवसृष्टी आहे आणि मानवच सर्वश्रेष्ठ आहे या विचाराला तडा जाण्याची अनेक संकेतस्थळे आहेत. एलियन्सची दुनिया कल्पनेपेक्षा रंजक, अद्भूत आणि विस्मयकारक आहे. भविष्याचे आशास्थान आहे तसेच ते भीतीदायक आव्हानांचे आगारदेखील! आपल्या सारखेच सजीव असले तरी तंत्रज्ञानाने प्रगत असणार्‍या एलियन्सची शक्यता जास्त असू शकते. एलियन्स पृथ्वीवर आले तर ते मानवांसाठी धोकादायक ठरेल. जर ते पृथ्वीवर पोहोचण्यात यशस्वी झाले तर याचा अर्थ त्यांच्याकडे खूप उच्च तंत्रज्ञान आहे. पृथ्वीवरील मनुष्य पुन्हा त्यांच्या दयेवर अवलंबून असेल. त्यांच्याकडे इथपर्यंत पोहोचण्यासाठी अवकाशयान असेल, तर त्यांच्याशी स्पर्धा करण्यासाठी आपल्याकडे पुरेशा गोष्टी नसतील. एलियन्स समोर आपण लहान मुलासारखे लाचार होऊ, असेही मत इलॉन मस्कने मांडले.

- Advertisement -

खरंतर ‘एलियन’ म्हणजे परग्रहावरून आलेले. लॅटिन शब्द एलियनचा अपभ्रंश होत बनला तो एलियन! म्हणजेच परदेशी किंवा बाहेरचा अनोळखी माणूस! टेरेस्ट्रिअल या लॅटिन शब्दाचा अर्थ पृथ्वीसंबंधी असा होतो. तर एक्स्ट्रा टेरेस्ट्रीयल या शब्दाचा अर्थ पृथ्वीच्या बाहेरील जगातून आलेली गोष्ट असा होतो. 22 वर्षांपूर्वी अमेरिकेतील माझ्या एका मैत्रिणीचे वडील एलियनचा शोध घेणार्‍या एका सिक्रेट प्रोजेक्टवर काम करीत होते. मैत्रीणीने जे काही सांगितले व शेअर केले ते खरे मानले तर अमेरिकेने अनेक एलियन्सला जिवंत पकडून ठेवले होते व आहे. परिणामी तंत्रज्ञानात झपाट्याने प्रगती करणे अमेरिकेला शक्य झाले.

एलियन्सने पळवून नेले आणि नंतर आणून सोडले असे सांगणारेदेखील अनेक असले तरी जवळपास त्या सर्वांना पागल है, असा शिक्का मारून आपण किती शहाणे आहोत हे सिद्ध करणार्‍या दीडशहाण्यांंची या जगात टंचाई मुळीच नाही. गेली अनेक वर्षे अमेरिकेवर एलियन्सची माहिती एक्स फाईल्समध्ये लपवल्याचा आरोपही केला जात आहे. बाय हूक ऑर क्रुक कसेही करून संपूर्ण जगावर नियंत्रण करण्याचे अमेरिकेचे स्वप्न लपून राहिलेले नाही. सर्व प्राणी फक्त वर्तमानकाळात जगतात. मानव हा एकच प्राणी आहे जो कोणतीही शारीरिक कुवत नसताना केवळ बुद्धीच्या जोरावर भूत-भविष्याचा विचार करतो. तसेच सर्व जगावर स्वामित्व मिळवण्याचा सतत प्रयत्न करत आपल्यासारख्या इतर माणसांना दडपत असतो हे एक कोडेच आहे.1902 मध्ये जॉर्जेस मेलिएसच्या ‘अ ट्रीप टू द मून’मध्ये एलियन्स पहिल्यांदा स्क्रीनवर दिसले. एलियनने पृथ्वीवर हल्ला केला आहे आणि त्यातून केवळ अमेरिकाच जगाला वाचवू शकते, अशा थिमचे किमान एक हजार चित्रपट हॉलीवूडमध्ये बनले. जगभर वितरित होणारे एलियनवरील चित्रपट हा निव्वळ योगायोग समजून घ्यावा का? एलियन पृथ्वीवरील सर्व माणसांना गुलाम बनवून टाकणार, पृथ्वीवरील लोकसंख्या नियंत्रणासाठी एलियन पृथ्वीवरील लोकांना पकडून मंगळावर नेणार, पृथ्वीवर लवकरच मंगळवासी हल्ला करतील, एलियन ऑल रेडी पृथ्वीवर दाखल झाले आहेत आणि समुद्रात लपून बसले आहेत असे एक ना दोन अनेक भीतीदायक तर्कवितर्क जगभर मांडले जात आहेत.
दुसर्‍या बाजूला या मंगळवासी एलियनबरोबर दोस्ती करून पृथ्वीवासीय सुखी होतील, मानवी सभ्यतेला भेडसावणारे प्रोब्लेम लवकरच कमी होतील, नवीन टेक्नॉलॉजी डेव्हलप होईल आदी सकारात्मक विचारदेखील मांडले जात आहेत. पुढील दहा वर्षांत काय काय होईल याचे उत्तर काळच देईल. एप्रिल 2022 अखेर आलेल्या बातमीनुसार एक अजब दावा केला गेला आहे. कुणाला भीतीदायक तर कुणाला गंमत वाटावी असा हा दावा आहे. जे आधी अमेरिकेच्या मिनिस्ट्री ऑफ डिफेन्ससाठी काम करणारे निक पोप यांनी केलेल्या दाव्यानुसार एलियन्स पृथ्वीवरील जनतेवर लक्ष ठेवण्यासाठी समुद्री पक्षी सिगल्सचा वापर गुप्तहेर म्हणून करीत आहेत. मुळात पृथ्वी ही एक जणू प्रयोगशाळा आहे. म्हणून पृथ्वीवरील माणूस उपराच! इमोशन्स आणि फिलिंग असलेले तसेच रिप्रॉडक्टिव्ह बायोमॅकॅनिकल मशीन्स म्हणजे मानवासह पृथ्वीवरील चराचर होय. मानवी सभ्यता धावत्या काळाच्या मोजपट्टीवर वागताना कोणकोणती जीवनमूल्ये कशी जपतात? कणखरपणा टिकवून प्रगती करतात? याचा रिसर्च एलियन करत असण्याची शक्यतादेखील नाकारता येणार नाही.

ईजिप्तमधले पिरॅमिडस, विमानाचा शोध लागण्याआधी ऍडमिरल पिरी रीस याने पृथ्वीच्या दोन्ही ध्रुवासह बनवलेला जगाचा नकाशा, नाझका पठारावर दिसलेले धावपट्टीसदृश रस्ते, आणि विमान नीट उतरावे म्हणून काढलेल्या खुणा, अँडीज पर्वतावरील पिस्को या डोंगरावर कोरलेला प्रचंड मोठा त्रिशुळ, ईस्टर आयलंड या केवळ ज्वालामुखीच्या लाव्हा रसाने बनलेल्या बेटावर असलेली पोलादापेक्षाही कठीण असलेल्या पाषाणात कातलेली अशी शिल्पे, ज्यातील चेहरे-पट्टी ही पृथ्वीतलावरील कुठल्याही वंशाशी जुळत नाहीत, ईजिप्तमधील स्फिंक्सची प्रतिकृती शेकडो किलोमीटर दूर ब्राझीलमधील रिओ डि जानेरोमध्ये एका डोंगरावर आढळणे, ईजिप्तसारखेच पिरॅमिडस मेक्सिको आणि काश्मीरमधील परिहासपुर येथील मंदिराचे भग्नावशेष स्वरुपात असणे, विशेषतः सर्व किरणोत्सर्गी ठिकाणे असल्याचे दिसणे आदी भलीमोठी जंत्री परग्रहवासी पृथ्वीवर नित्यनियमाने भेट देत आले आहेत, अशी साक्ष देतात हे सत्य आहे.

मानव आणि मानवी समुह लॉजिकच्या आधारे कितीकाळ उत्थानपूर्ण व ऊर्ध्वगामी निर्णय घेतात? भौतिकवस्तूंचा संचय करीत आयुष्याचे डबके किंवा गटारगंगा न करण्याचा निर्णय घेत किती महामानव तग धरतात? सत्य आणि कर्म सिद्धांत अवलंबत आनंदाचे डोही आनंद तरंग करणारे किती लोक या पृथ्वीवर आहेत? असे कितीतरी विषय हे कदाचित एलियनसाठी संशोधनाचे रिसर्च प्रॉब्लेम असू शकतील. मानवी बिजारोपन पृथ्वीवर कसे झाले याबद्दल अनेक आख्यायिका जगभर प्रचलित आहेत. नासाकडे माहिती असलेल्या किमान 4 हजार सूर्यमालांमध्ये पृथ्वीसारख्या जीवनाची व एलियन्सची संभावना दर्शवते. यात किमान 19 ग्रह हे हुबेहुब पृथ्वीसारखे पाणी असलेले जीवनाचा भास-आभास नव्हे तर वास्तव मांडत आहेत. परिणामी येत्या काळात पृथ्वीवर एलियन्सद्वारे होणार्‍या हल्ल्याचा सामना करण्यासाठी मानवजातीने एकजूट होणे आवश्यक आहे हेच खरे!

प्रा. किरणकुमार जोहरे

(लेखक भौतिकशास्त्रज्ञ व तंत्रज्ञ आहेत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -