Eco friendly bappa Competition
घर भविष्य आजचे राशीभविष्य राशीभविष्य : सोमवार 21 ऑगस्ट 2023

राशीभविष्य : सोमवार 21 ऑगस्ट 2023

Subscribe

मेष : मनाचे स्थैर्य राहील. जवळचे लोक मदत करतील. नोकरीत कामाचा व्याप वाढला तरी तुम्ही यश मिळवाल.

वृषभ : महत्त्वाचे काम करून घ्या. नोकरीत वरिष्ठांना खूश करता येईल. धंद्यात फायदा होईल. वाद करू नका.

- Advertisement -

मिथुन : नोकरीत कामामध्ये सावध रहा. चूक होऊ शकते. बोलण्यातून गैरसमज होऊ शकतो. पोटाची काळजी घ्या.

कर्क : आज ठरविलेले काम उद्यासाठी बाकी ठेवू नका. वरिष्ठांना खूश करू शकाल. धंद्यात तडजोड करा.

- Advertisement -

सिंह : नोकरीमध्ये समस्येवर चर्चा करताना सावधपणे बोला. नवीन ओळखी होतील. कलेत प्रगती होईल.

कन्या : धंद्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न करता येईल. कला-क्रीडा क्षेत्रात नावलौकिक मिळेल.

तूळ : कामाचा व्याप वाढेल. रागाचा पारा वाढू देऊ नका. वरिष्ठ तुमचे कौतुक करतील. धंदा वाढेल.

वृश्चिक : घरात शुभ घटना घडेल. वादविवादात सरशी होईल. आज ठरविलेले काम उद्यावर टाकू नका.

धनु : तुमचा अवमान करण्याचा प्रयत्न नोकरीत होईल. राजकीय-सामाजिक कार्यात अडचणी येतील.

मकर : महत्त्वाचे काम आजच करून घ्या. आळस करू नका. जमीन, घर यासंबंधी समस्या सोडवा.

कुंभ : क्षुल्लक कारणाने मन उदास होईल. धंद्यात नवे काम मिळेल. दुसर्‍याला मदत करावी लागेल.

मीन : राजकीय-सामाजिक कार्यात पद मिळेल. धंद्यात जम बसवा. वाहन जपून चालवा.

- Advertisment -