घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य : गुरुवार ३० नोव्हेंबर २०२३

राशीभविष्य : गुरुवार ३० नोव्हेंबर २०२३

Subscribe

मेष ः- तुमच्या कार्याला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळेल. दौर्‍यात किरकोळ त्रास होऊ शकतो. खाण्याची काळजी घ्या.

वृषभ ः- कोर्टाची अथवा इतर महत्त्वाची कामे करून घ्या. धंद्यात वाढ होईल. कला क्षेत्रात तुमची कल्पना आवडेल.

- Advertisement -

मिथुन ः- वाहनाचा त्रास होईल. यांत्रिक बिघाडामुळे पैसा खर्च होईल. दुखापत होऊ शकते. काळजी घ्या.

कर्क ः- आजचे काम उद्यावर टाकू नका. प्रेमाला चालना मिळेल. कला-क्रीडा-साहित्यात नवा प्रयोग करू शकाल.

- Advertisement -

सिंह ः- अपेक्षित व्यक्तीची भेट झाल्याने चर्चा सफल होईल. मोठेपणा नको. कुणालाही कमी समजू नका.

कन्या ः- तुमचे काम होणे महत्त्वाचे आहे. त्यावर लक्ष ठेवा. मेहनत घ्या. धंद्यात फायदा मिळेल. कल्पनाशक्ती वाढेल.

तूळ ः- भावना अनावर होईल. प्रेमाची माणसे कदाचित तुम्हाला तोडून बोलण्याची शक्यता आहे. दुखापत होऊ शकते.

वृश्चिक ः- आजच्या कामात आळस केल्यास ते अर्धवट राहील. उद्याच्या भरवशावर राहू नका. कलाक्षेत्रात रमाल.

धनु ः- जास्त विश्वास कुणावर टाकू नका. प्रकृतीची छोटीशी तक्रार निर्माण होऊ शकते. जवळच्या व्यक्तीचा विरह जाणवेल.

मकर ः- आजच महत्त्वाचे काम करा. स्पर्धेत चमकाल. धंद्यात निर्णय घेता येईल. थकबाकी मिळवा.

कुंभ ः- विचारांना योग्य दिशा मिळेल. क्षुल्लक मतभेद होईल. प्रवासात सावध रहा. नवीन ओळख होईल.

मीन ः- धंद्यात फायदा होईल. कल्पनाशक्तीला चालना मिळेल. कला क्षेत्रात चमकाल. प्रेमाला प्रतिसाद मिळेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -