घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य : मंगळवार १६ जानेवारी २०२४

राशीभविष्य : मंगळवार १६ जानेवारी २०२४

Subscribe

मेष – महत्त्वाचा निर्णय अथवा मोठे काम सकाळीच करून घ्या. नंतर विलंबाने यश मिळेल. धंदा वाढेल.

वृषभ – कोर्ट कचेरीच्या कामात यशस्वी व्हाल. धंद्यात काम मिळेल. नव्या नोकरीचा प्रयत्न करा.

- Advertisement -

मिथुन – कठीण काम करण्याचा प्रयत्न करावा. अधिकारी वर्गाशी सलोख्याने वागा. वाहन जपून चालवा.

कर्क – दुखापत होण्याचा संभव आहे. कोणतेही काम सावधपणेच करा. मान-प्रतिष्ठा मिळेल. यश मिळेल.

- Advertisement -

सिंह – सकाळी लवकर महत्त्वाची कामे करा. दुपारनंतर धावपळ होईल. विरोध सहन करा. संयम बाळगा.

कन्या – सकाळी झालेला वाद चहानंतर मिटेल. महत्त्वाचा फोन येईल. शेजार्‍याला मदत करावी लागेल.

तूळ – सकाळी होणारी कामे दुपारनंतर रेंगाळण्याची शक्यता आहे. नोकरीत कामाचा व्याप वाढेल.

वृश्चिक – महत्त्वाचा निर्णय घेता येईल. विचारांना चालना मिळेल. स्पर्धेत जिंकाल. खर्च जास्त होईल.

धनु – साहित्याला नवा विषय मिळेल. नवीन ओळख होईल. नोकरीत वरिष्ठांच्या मनाप्रमाणे निर्णय घ्यावा लागेल.

मकर – दूरच्या प्रवासाचा बेत ठरवाल. ठरविलेली योजना चांगल्या प्रकारे पूर्ण करता येईल. कोर्टकेसमध्ये यश येईल.

कुंभ – धंद्यासाठी नवा मार्ग मिळेल. मुलांची प्रगती पाहून तुम्हाला समाधान मिळेल. नवी ओळख होईल.

मीन – सकाळी आलेली समस्या जेवणानंतर कमी होईल. नव्या विषयात रममाण व्हाल. धंद्यात नवे काम मिळेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -