घरICC WC 2023'BOSS असावा तर असा'; विश्वचषकातील भारताच्या पराभवातून सावरण्यासाठी कर्मचाऱ्यांना दिली सुट्टी

‘BOSS असावा तर असा’; विश्वचषकातील भारताच्या पराभवातून सावरण्यासाठी कर्मचाऱ्यांना दिली सुट्टी

Subscribe

भारतीय क्रिकेट संघाच्या पराभवातून सावरण्यासाठी एका कंपनीने आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना एक दिवसाची सुट्टी दिली आहे. कंपनीने दिलेली ही सुट्टी प्रत्येकासाठी खूप खास आहे.

गुरुग्राम: क्रिकेट विश्वचषक (वर्ल्ड कप 2023) मध्ये भारताच्या पराभवानंतर सगळेच दुःखी आहेत. सोशल मीडियावर ते आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत. लोक विविध मार्गांनी हे दु:ख विसरण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा परिस्थितीत भारतीय क्रिकेट संघाच्या पराभवातून सावरण्यासाठी एका कंपनीने आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना एक दिवसाची सुट्टी दिली आहे. कंपनीने दिलेली ही सुट्टी प्रत्येकासाठी खूप खास आहे. कंपनीच्या या उपक्रमाचे सर्वजण कौतुक करत आहेत. (BOSS Should be like This Employees were given leave to recover from India’s defeat in the World Cup 2023 final )

सामना हरल्यानंतर ऑफिसमधून मिळाली सुट्टी

हे दुःख दूर करण्यासाठी गुरुग्राममधील एका कंपनीने आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना एक दिवसाची सुट्टी देऊ केली आहे. कंपनीच्या बॉसने सर्व कर्मचाऱ्यांना मेलद्वारे याची माहिती दिली. भारताचा पराभव ही राष्ट्रीय निराशा म्हणून पाहून कंपनी बॉसने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे सर्व कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे त्यांना मिळालेला आनंद खूप खास आहे. सगळेच त्याचे कौतुक करत आहेत.

- Advertisement -

सोशल मीडियावर कौतुक

या कंपनीत काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याने एचआरने केलेला मेल सोशल मीडियावर शेअर केला आहे. एचआरने केलेल्या मेलमध्ये असे लिहिले आहे की कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना प्राधान्य देण्यात नेहमीच पुढे आहे. यावेळीही कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी एक निर्णय घेत आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या झालेल्या पराभवातून स्वत:ला सावरण्यासाठी कंपनीने कर्मचाऱ्यांना एक दिवसाची सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे जेणेकरून त्यांचा मूड रिफ्रेश होईल आणि ते पुन्हा जोशाने ऑफिसला येतील. कंपनीच्या या मेलवर लोकांकडून जबरदस्त प्रतिक्रिया येत आहेत. अशी कंपनी आणि बॉस मिळावा अशी आशा प्रत्येकजण व्यक्त करत आहे.

- Advertisement -

(हेही वाचा: PHOTOS: ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 संघ जाहीर; सूर्यकुमार यादव कर्णधार, इतर खेळाडू कोण आहेत? )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -