घरIPL 2020RR vs KXIP: राजस्थानने पंजाबची विजयी घौडदौड रोखली; स्पर्धेतील आव्हान जिवंत

RR vs KXIP: राजस्थानने पंजाबची विजयी घौडदौड रोखली; स्पर्धेतील आव्हान जिवंत

Subscribe

राजस्थान रॉयल्सने किंग्ज इलेव्हन पंजाबला हरवत पंजाबची विजयी घौडदौड रोखली. पंजाबच्या १८६ धावांचं आव्हान राजस्थानने १८ व्या षटकात पूर्ण केलं. या विजयामुळे राजस्थानचं स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवलं आहे. राजस्थानच्या विजयात बेन स्टोक्स (५०), संजू सॅमसन (४८) आणि स्टीव्ह स्मिथची (३१) महत्त्वाची भूमिका होती.

या सामन्यात राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. पंजाबच्या डावाची खराब सुरुवात झाली. जोफ्रा आर्चरने मनदीप सिंगला खातेही न उघडता माघारी पाठवले. यानंतर मात्र कर्णधार लोकेश राहुल आणि क्रिस गेल यांनी पंजाबचा डाव सावरला. या दोघांनी उत्कृष्ट फलंदाजी करत १२० धावांची भागीदारी रचली. अखेर राहुलला बाद करत बेन स्टोक्सने ही जोडी फोडली. राहुलने ४१ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ४६ धावांची खेळी केली.

- Advertisement -

गेलने मात्र त्याची चांगली फलंदाजी सुरु ठेवत ३३ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. अर्धशतक झाल्यावर त्याने धावांची गती वाढवली. त्याला निकोलस पूरनने १० चेंडूत २२ धावा करत उत्तम साथ दिली. परंतु, पूरनलाही स्टोक्सने बाद केले. तर गेलचे शतक अवघ्या एका धावेने हुकले. त्याने ६३ चेंडूत ६ चौकार आणि ८ षटकारांच्या मदतीने ९९ धावांची खेळी केली. मात्र, आर्चरच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या नादात तो बाद झाला. गेलच्या फटकेबाजीमुळे पंजाबने २० षटकांत ४ बाद १८५ अशी धावसंख्या उभारली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -