घरIPL 2020IPL 2022 : मुंबईने चार वर्षांनी घेतला दिल्लीचा बदला

IPL 2022 : मुंबईने चार वर्षांनी घेतला दिल्लीचा बदला

Subscribe

आयपीएल 2022 मध्ये दिल्ली संघाला शेवटच्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे या संघाच्या प्ले ऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा संपुष्टात आल्या होत्या. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी दिल्लीला मुंबईविरुद्धचा शेवटचा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकायचा होता, मात्र, दिल्लीला हा सामना जिकता आला नाही.त्यामुळे दिल्ली संघाचा आयपीएल 2022 मधला प्रवास संपला. या सामन्यात अनेक विक्रम झाले. मुंबईने दिल्लीकडून चार वर्षांपूर्वीचा बदला घेतला. या सामन्यात कुलदीप यादवने रवींद्र जडेजाचा विक्रम मोडला.

मुंबईने घेतला बदला –

- Advertisement -

2018 मध्ये मुंबईला प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी शेवटचा सामना जिंकणे आवश्यक होते. हा सामना दिल्ली विरुद्ध मुंबई असा होता. अखेरच्या सामन्यात दिल्लीने मुंबईचा पराभव केल्यामुळे मुंबईचा संघ प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी पाचव्या स्थानावर राहिला. त्याचवेळी दिल्लीचा संघ शेवटच्या स्थानावर होता. चार वर्षांनंतर मुंबईने दिल्ली टीमचा बदला घेतला आहे. यावेळी दिल्ली टीमला प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी शेवटच्या सामन्यात विजय आवश्यक होता. मात्र, संपूर्ण आयपीएलच्या सीजनमद्ये चांगली कामगिरी न करणाऱ्या मुंबईविरुद्ध दिल्लीचा शेवटचा सामना होता. पण मुंबईने दिल्लीला पराभूत केले आणि दिल्ली पाचव्या स्थानावर राहून प्लेऑफमध्ये पोहोचू शकली नाही. यासोबतच मुंबई अंक तालिकेमध्ये शेवटच्या स्थानावर आहे.

रोहित शर्माला करता आले नाही अर्धशतक –

- Advertisement -

या सामन्यात दोन धावांसह, रोहित शर्मा आयपीएलच्या इतिहासातील पहिला फलंदाज बनला ज्याने संपूर्ण आयपीएल हंगामात संघासाठी डाव उघडला परंतु त्याला अर्धशतक झळकावता आले नाही.या सान्यात दोन धावांसह रोहित शर्मा आयपीएलच्या इतिहासातील संघासाठी डाव सुरू करणारा पण अर्धशतक न झळकावनारा पहिला फलंदाज बनला आहे. या हंगामात रोहितला एकाही सामन्यात मुंबईसाठी 50 धावा करता आल्या नाहीत. या आधी आयपीएलमध्ये असा कोणताही सलामी वीर नव्हता की ज्याने टीमसाठी अर्धशतक केले नाही.

कुलदीपने तोडला जडेजाचा विक्रम –

या सामन्यात दिल्ली सघाच्या कुलदीप यादवने रवींद्र जडेजाचा आठ वर्ष जुना विक्रम मोडला. कुलदीपने यावर्षी २१ विकेट घेतल्या. कुलदीप यादव आयपीएलच्या एका हगामात सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. त्याच्याआधी प्रग्यान ओझाने 2010 मध्ये 21 विकेट घेतल्या होत्या. 2014 मध्ये जडेजाने 19 विकेट घेतल्या होत्या. त्याचवेळी 2009 मध्ये प्रग्यान ओझाने 18 विकेट घेतल्या होत्या.

मुंबईचे पॉवर प्लेमधील खराब प्रदर्शन –

मुंबईने पॉवरप्लेमधेय या आयपीएल हंगामातील सर्वात खराब प्रदर्शन केले. मुंबईने पहिल्या सहा षटकात एक गडी बाद 27 धावा केल्या. या हंगामातील हा चौथा सर्वात वाईट पॉवर प्ले स्कोअर होता. यापूर्वी हैदराबादने पॉवर प्लेमध्ये राजस्थानविरुद्ध तीन बाद 14 धावा केल्या होत्या. कोलकताने पुण्याविरुद्ध तीन विकेट्स गमावून 25 धावा केल्या होत्या. तर चेन्नईने पंजबाविरुद्ध चार बाद 27 धाव केल्या होत्या.

 

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -