घरलाईफस्टाईलबाजरी हुरड्याचं थालीपीठ

बाजरी हुरड्याचं थालीपीठ

Subscribe

एकदा तरी नक्की ट्राय करा बाजरी हुरड्याचं थालीपीठ. हे थालीपीठ तुम्ही नाश्ताला देखील खाऊ शकता.

साहित्य

- Advertisement -

बाजरी हुरड्याचे पीठ एक पेला
पाव वाटी बेसन
पाव वाटी गव्हाचं पीठ
एक पेला चिरलेली कोथिंबीर
सात-आठ लसूण पाकळ्या
ठेचा दोन टेबलस्पून
पाव चमचा ओवा
हळद एक टेबलस्पून
सालं-बिया काढून बारीक चिरलेले दोन टोमॅटो
बारीक चिरलेले दोन कांदे
तेल
चवीपुरतं मीठ

कृती

- Advertisement -

प्रथम सर्व पीठं परातीत चाळून घेऊन एक करावे. मग त्यात इतर जिन्नस कोथिंबीर, कांदा, लसूण-मिरची-जीर ठेचा, हळद, ओवा, टोमॅटो आणि मीठ घालून लागेल तेवढंच पाणी घालत राहा आणि घट्ट पीठाचा गोळा मळून घ्या. या गोळ्याला तेलाचा हात लावून तो किमान अर्धा तासं झाकून ठेवा. नंतर एका सुती कापडाला तेल लावून, लिंबाएवढा एक एक गोळा घेऊन तो हलक्या हाताने पुरीपेक्षा जरा मोठा थापावा आणि तव्यावर थोडे तेल घेऊन त्यावर टाकावा. खालची बाजू पुरेशी भाजली की थालीपीठ उलटा आणि पुन्हा कडेने थोडे तेल सोडा. दोन्ही बाजूने तेल लावून थालीपीठ खरपूस भाजले, की खायला मस्त लागते. कोणत्याही चटणी किंवा सॉससोबत या थालीपीठांचा मस्त आस्वाद घ्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -