घरलाईफस्टाईलपावसाळ्यात फंगल इन्फेक्शन्स टाळण्यासाठी तयार रहा!

पावसाळ्यात फंगल इन्फेक्शन्स टाळण्यासाठी तयार रहा!

Subscribe

पावसाळ्यात, इतर प्रकारच्या जंतूसंसर्गांबरोबरच काही त्वचारोगही डोके वर काढतात. अशा दिवसात फंगल इन्फेक्शन्स मोठ्या

पावसाळ्यात, इतर प्रकारच्या जंतूसंसर्गांबरोबरच काही त्वचारोगही डोके वर काढतात. त्यात मुंबईतील उष्ण आणि दमट हवामान त्वचेला होणाऱ्या बुरशीजन्य, विषाणूजन्य आणि बॅक्टेरियाजन्य जंतूसंसर्गांसाठी फारच पोषक आहे. अॅलर्जी असलेल्या रुग्णांसाठीही मान्सूनचा हा काळ खडतर असतो. कारण याच काळात एक्झेमा (डर्मिटायटिस) आणि अर्टिकॅरिया (हाइव्ह्ज) चिघळतात. या मोसमात अॅलर्जी, एक्झमा आणि फंगल इन्फेक्शन, किटकदंशाच्या रुग्णांचे प्रमाण ८०% –९०% वर पोहोचते. अनेक लहान मुलेही अटॉपिक डर्मिटायटिस आणि व्हायरल इन्फेक्शनची त्रस्त होतात. या चिंताजनक विकारांबद्दल थोड्या तपशीलांत जाणून घेऊया

फंगल इन्फेक्शन्स (बुरशीजन्य जंतूसंसर्ग

सर्वसाधारणपणे रिंगवर्म, दाद, दादर, दराज या नावांनी ओळखले जाते. अशाप्रकारचा जंतूसंसर्ग हा फोमाइट्सच्या माध्यमातून होतो. उदा. सार्वजनिक स्वच्छतागृहे, एकच टॉवेल, भांडी वापरणे इत्यादी. या संसर्गाची लागण एकदा झाली की नखांद्वारे त्याचे जंतू शरीरभर पसरतात आणि रुग्णाला संसर्ग झालेल्या ठिकाणी खाज येऊ लागते.

- Advertisement -

फंगल इन्फेक्शन हे बहुतेकदा पायाच्या बोटांच्या खाचांमध्ये होते. त्यामुळे याला अॅथलिट्स फूट, असेही म्हटले जाते आणि पापुद्र्यांसारख्या पांढऱ्या डागांच्या रूपात दिसून येते. पावसाच्या पाण्यातून चालताना पायांत बंद बूट आणि मोजे घातलेले असणे हे त्यामागचे कारण आहे. त्याऐवजी या दिवसांत आपण सर्व बाजूंनी उघड्या असलेल्या चपला किंवा सॅँडल्स घालायला हव्यात. ऑफिसमध्ये किंवा घरी पोहोचल्यावर त्या सहज बदलता येतील. मान्सूनच्या दिवसांत जांघ, मांड्यांचा आतला भाग आणि काखांसारख्या शरीराचा दुमडणाऱ्या भागांमध्ये अशाप्रकारचा जंतूसंसर्ग झाल्याचे सरसकट दिसून येते. अशा जंतूसंसर्गाच्या जागी भरपूर खाज सुटते आणि खाजवल्याने नखे बाधून दुसऱ्या प्रकारचा जंतूसंसर्ग होतो, ज्यामुळे संसर्गाच्या जागची त्वचा रंगहीन (पिवळसरहिरवट) आणि हळवी बनते.

फंगल इन्फेक्शन कसे टाळावे?

सर्व बाजूंनी खुली असतील अशी पादत्राणे घालावीत. भिजलेले कपडे, मोजे आणि अंतर्वस्त्रे शक्य तितक्या लवकर बदलावीत. आंघोळीनंतर, मोजे घालण्यापूर्वी आणि संध्याकाळी झोपण्यापूर्वी बुरशीरोधक म्हणजे अँटीफंगल डस्टिंग पावडर लावावी. खाजवणे किंवा ओरखडे काढणे टाळावे. जंतूसंसर्गावर वेळच्या वेळी उपचार व्हावेत आणि त्याचा फैलाव रोखता यावा यासाठी डर्मिटोलॉजिस्टचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -