घरमहाराष्ट्रभाजपमध्ये आज प्रवेशासाठी रांगा!

भाजपमध्ये आज प्रवेशासाठी रांगा!

Subscribe

आमदार शिवेंद्रराजे भोसले, वैभव पिचड, संदीप नाईक, कालिदास कोळंबकर, ज्येष्ठ नेते मधुकर पिचड, चित्रा वाघ यांच्या हाती कमळ

काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे धरण फुटले असून लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी भाजपमध्ये मोठ्या संख्येने जाण्यासाठी उत्सुक आहेत. अशा आयारामांसाठी भाजपच्यावतीने बुधवारी मेगाभरतीचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले, वैभव पिचड, संदीप नाईक तर काँग्रेसचे कालिदास कोळंबकर हे या मेगाभरतीतील मुख्य चेहरे असणार आहेत.

याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री मधुकर पिचड यांनाही प्रवेश देणार येईल. याचबरोबर नवी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांच्या हाती कमळ देण्यात येणार आहे. गरवारे क्लब येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत हे प्रवेश होणार असून त्यावेळी गिरीश महाजन यांच्यासह भाजपचे प्रमुख नेते हजर राहणार आहेत. नेत्यांबरोबर त्यांचे समर्थक आणि पदाधिकारीही भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याने या कार्यक्रमात मोठी गर्दी होईल. दरम्यान राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक यांनी तुर्तास वेट अ‍ॅण्ड वॉचचे धोरण अवलंबले आह

- Advertisement -

आमदार वैभव पिचड, शिवेंद्रराजे भोसले, संदीप नाईक, बबन शिंदे, दिलीप सोपल हे राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडण्यासाठी उत्सुक होते. त्यापैकी पिचड, नाईक आणि भोसले यांनी आपले राजीनामे मंगळवारी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे दिले. तर काँग्रेसमधून बाहेर पडून भाजपमध्ये येण्यासाठी तयार असलेल्या कोळंबकर यांनी राजीनामा देत भाजपमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा केला. मात्र काँग्रेसचे आमदार सुनील केदार, जयकुमार गोरे, गोपालदास अग्रवाल, भारत भालके आणि माजी आमदार सिद्धराम म्हेत्रे यांनी आपला भाजप प्रवेश सध्या लांबणीवर टाकला आहे.

शिवेंद्रराजे भोसले सातार्‍यातील जावळी मतदारसंघातील आमदार असून वैभव पिचड अहमदनगर येथील अकोले, तर कालिदास कोळंबकर मुंबईतील वडाळा तसेच संदीप नाईक हे नवी मुंबईतीत बेलापूर मतदारसंघाचे आमदार आहेत. तिन्ही नेते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी सांगितले.

- Advertisement -

शिवेंद्रराजे यांच्या पक्षांतराच्या चर्चा सुरु झाल्यानंतर ते बाहेर पडणार नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी सांगितले होते. शिवेंद्रराजे आणि उदयनराजे यांच्यातील वाद मिटवण्याचे प्रयत्न खुद्द पवारांनी केले होते. मात्र वाद मिटण्याची चिन्हे दिसत नसल्याने आणि आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी अखेर शिवेंद्रराजे यांनी मंगळवारी राजीनामा दिला आहे. त्यांच्यासह सातार्‍यातील बाजार समिती, खरेदीविक्री संघ आणि जिल्हा बँकेचे संचालकही भाजपमध्ये जाणार आहेत.
राष्ट्रवादीचे संस्थापक सदस्य आणि शरद पवार यांचे खंदे समर्थक मधुकर पिचड यांचे पुत्र वैभव पिचड यांनी आमदारकीचा राजीनामा देताना गेल्या पाच वर्षांपासून अकोले तालुक्याचा विकास रखडला असून रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे.

तालुक्याचा विकास व्हावा ही जनतेची भावना ओळखून भाजपत जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले होते. कोळंबकर यांनी मांगवारी आपला राजीनामा प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे सुपूर्त केला होता. ’मी काँग्रेसवर नाराज असून मुख्यमंत्री फडणवीसांच्या कामाचे कौतुक केले म्हणून मला पक्षाने बाहेर केले ,’ असे म्हणत भाजप प्रवेशाची घोषणा केली. कोळंबकर हे पूर्वीच्या नायगाव आणि आताच्या वडाळा मतदारसंघातून सहावेळा विधानसभेवर निवडून आले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -