घरमहाराष्ट्रधनगर समाजाला आदिवासींच्या सवलती

धनगर समाजाला आदिवासींच्या सवलती

Subscribe

अनुसूचित जमातीच्या २२ योजना होणार लागू

आगामी विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्यामुळे सरकारने समाजातील सर्व घटकांना खूश करण्याचा सपाटा लावला आहे. आधी मराठा समाजाला आरक्षण दिल्यानंतर आता धनगर समाजालाही दिलासा देण्यात आला आहे. राज्य सरकारने आदिवासी समाजाला देण्यात येणार्‍या सर्व सवलती धनगर समाजाला देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मंत्रीमंडळ बैठकीत घेतला. अनुसूचित जमातीच्या २२ योजना धनगर समाजाला लागू करण्यात येणार आहेत.

राज्य मंत्रीमंडळाने आदिवासी विभागामार्फत अनुसूचित जमातीसाठी सुरु असलेल्या योजनांच्या धर्तीवर धनगर समाज बांधवांच्या विकासासाठी विशेष कार्यक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. आदिवासी विकास विभागामार्फत अनुसूचित जमातीसाठी सुरु असलेल्या योजनांच्या धर्तीवर एकूण १३ योजना सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भटक्या जमाती ‘क’ या प्रवर्गासाठी भूमिहीन मेंढपाळ कुटुंबासाठी अर्धबंदिस्त, बंदिस्त, मेंढीपालनासाठी जागा उपलब्ध करुन देणे किंवा जागा खरेदीसाठी अनुदान तत्वावर अर्थसहाय्य देणे, वसतिगृह योजनेपासून वंचित असलेल्या भटक्या जमाती ‘क’ या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आदिवासी विकास विभागाच्या स्वयंम योजनेच्या धर्तीवर स्वतंत्र योजना कार्यान्वित करणे, भटक्या जमाती ‘क’ या प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी माध्यमांच्या शाळांत प्रवेश देणे, भटक्या जमाती ‘क’ प्रवर्गातील ग्रामीण भागातील बेघर कुटुंबांना,

- Advertisement -

पहिल्या टप्प्यात १० हजार घरकुलं बांधून देणे,भटक्या जमाती ‘क’ या प्रवर्गातील आवश्यक असलेल्या परंतु अर्थसंकल्पित निधी नसलेल्या योजना राबवण्यासाठी न्युक्लिअस बजेट योजना, राज्यातील भटक्या जमाती ‘क’ प्रवर्गातील व्यक्ती सदस्य असलेल्या सहकारी सूत गिरण्यांना भागभांडवल मंजूर करणे, केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेत भटक्या जमाती ‘क’ या प्रवर्गातील नवउद्योजकांना सहाय्य करण्यासाठी मार्जिन मनी उपलब्ध करुन देणे, भटक्या जमाती ‘क’ प्रवर्गातील मेंढपाळ कुटुंबांना पावसाळ्यात चराईकरता जून ते सप्टेंबर या ४ महिन्यांसाठी चराई अनुदान देणे, भटक्या जमाती ‘क’ प्रवर्गातील होतकरु बेरोजगार पदवीधर युवक युवतींना स्पर्धा परीक्षापूर्व निवासी प्रशिक्षण, भटक्या जमाती ‘क’ प्रवर्गातील बेरोजगार युवक युवतींना स्पर्धा परीक्षेसाठी आर्थिक सवलती लागू करणे, भटक्या जमाती ‘क’ प्रवर्गातील बेरोजगार युवक युवतींना लष्करातील सैनिक भरती व राज्यातील पोलीस भरतीसाठी आवश्यक ते मूलभूत प्रशिक्षण देणे,अशा सुविधा आहेत.

ग्रामीण भागातील कुक्कुटपालन संकल्पेनर्गत भटक्या जमाती ‘क’ प्रवर्गातील जमातीसाठी ७५ टक्के अनुदानावर चार आठवडे वयाच्या सुधारित देशी प्रजातीच्या १०० कुक्कुट पक्ष्यांच्या खरेदी आणि संगोपनासाठी अर्थसहाय्य, नवी मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक, नागपूर व अमरावती या महसूली विभागांच्या मुख्यलायाच्या ठिकाणी भटक्या जमाती ‘क’ प्रवर्गातील मॅट्रिकोत्तर शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह निर्माण करणे, या सुविधांचाही त्यात समावेश आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -