Monday, March 24, 2025
27 C
Mumbai
Homeलाईफस्टाईलहिवाळ्यात अशी घ्या चिमुकल्यांची काळजी

हिवाळ्यात अशी घ्या चिमुकल्यांची काळजी

Subscribe

बाळाची त्वचा नाजूक असल्यामुळे हिवाळ्यात त्यांची काळजी घेणं अत्यंत गरजेचं असतं.

हिवाळ्यात लहान बाळांच्या त्वेचकडे लक्ष देणं अत्यंत महत्त्वाचं असतं. लहान बाळांची त्वचा खूप नाजूक असते. त्यामुळे त्यांच्या त्वचेची काळजी घेणं गरजेचं असतं.

बाळाला घाला उबदार कपडे

बाळाला घाला उबदार कपडे

हिवाळ्यात थंडीच्या कारणाने बाळाला जाड कपडे घातले जातात. मात्र याच कपड्यांमुळे त्यांना त्रास होत असतो आणि त्यामुळे बाळाच्या अंगावर हिट रॅशेस येऊ शकतात. म्हणून बाळाला जाड कपडे घालण्या ऐवजी लोकरीचे उबदार कपडे घालावेत. यामुळे त्यांच्या त्वेचेला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही.

अशी घ्या बाळाच्या ओठांची काळजी

अशी घ्या बाळाच्या ओठांची काळजी

हिवाळ्यात प्रत्येकालाच ओठांची समस्या उद्भवते. ओठ शुष्क होतात आणि त्यावरील त्वचा निघते. लहान बाळाचे ओठ हे प्रचंड नाजूक असतात. म्हणून त्यांच्या ओठांवर लगेच परिणाम होतो. त्यामुळे अशावेळी रोज बाळाच्या ओठांना घरगुती तूप किंवा दुधाची साय लावावी.

बाळाच्या त्वचेसाठी डॉक्टरांच्या घ्या सल्ला

बाळाच्या त्वचेसाठी डॉक्टरांच्या घ्या सल्ला

हिवाळ्यात त्वचा कोरडी होते. त्यामुळे बाळाच्या त्वचेत ओलावा राखवा. यासाठी डॉक्टरांच्या सल्लाने चांगल्या प्रतीचं मॉश्चरायझर लावावं.

हिवाळ्यात बाळाला सतत आंघोळ घालणं टाळा

हिवाळ्यात बाळाला सतत आंघोळ घालणं टाळा

हिवाळ्याच्या दिवसात बाळाला सतत आंघोळ घालणं टाळा. आंघोळी घालण्या अगोदर संपूर्ण शरीराला तेल लावून हलक्या हाताने मालिश करा. त्यानंतर कोमट पाण्याने बाळाला आंघोळ घाला. मग पटकन त्याला सुती किंवा मऊ कापडाने पुसून घ्या.